शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

४० जखमी : मृतांत एका बालकाचा समावेश; वालदेवी पुलाजवळील घटना वºहाडाचा टेम्पो उलटून दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:48 IST

पाथर्डी फाटा येथून लग्नाचे वºहाड घेऊन घोटीकडे जाणारा भरधाव टेम्पो मुंबई-आग्रा महामार्गावर वालदेवी नदी पुलाजवळ उलटल्याची घटना मंगळवारी (दि़ १९) सकाळी घडली़

ठळक मुद्देजखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार रस्त्यावर सर्वत्र रक्त पडलेले

नांदूरवैद्य/नाशिक : पाथर्डी फाटा येथून लग्नाचे वºहाड घेऊन घोटीकडे जाणारा भरधाव टेम्पो मुंबई-आग्रा महामार्गावर वालदेवी नदी पुलाजवळ उलटल्याची घटना मंगळवारी (दि़ १९) सकाळी घडली़ या अपघातात कार्तिक दीपक माळी (रा. नायगाव) हा पाच वर्षीय मुलगा व चालकाशेजारी बसलेला गोपाळ रमेश पवार (४०, रा. पाथर्डी गाव, नाशिक) हे दोघे जागीच ठार झाले, तर टेम्पोतील चाळीस वºहाडी जखमी झाले आहेत. या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, टेम्पोचालकाविरोधात वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी गावातील काळू किसन माळी यांच्या मुलाचा मंगळवारी अस्वली स्टेशनजवळ असलेल्या नांदगाव येथे विवाह सोहळा होता. या विवाहासाठी पाथर्डी गावातून सुमारे ५५ वºहाडी ४०७ टेम्पोने (एमएच १५, डीके २०९०) जात होते़ मुंबई-आग्रा महामार्गावरून घोटीच्या दिशेने जात असलेला हा टेम्पो सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वाडीवºहेजवळील वालदेवी नदीवरील पुलाच्या अलीकडे उतारावरून चढाच्या दिशेने जात असताना, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हुंडाई मोटारच्या गुदामासमोरच उलटला व सुमारे तीस फूट घसरत गेला़ नायगाव येथील कार्तिक माळी हा चिमुरडा अपघातात जागीच ठार झाला, तर चालकाशेजारी बसलेले पाथर्डी गावातील गोपाळ पवार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ टेम्पोत बेसावध बसलेले वºहाडी एकमेकांच्या अंगावर पडल्याने जखमी झाले. रस्त्यावर सर्वत्र रक्त पडलेले होते़ वाडीवºहे पोलीस ठाण्यास अपघाताची माहिती कळताच ते घटनास्थळी पोहोचले व १०८ रुग्णवाहिकेस माहिती दिली़ त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ टेम्पोतील वºहाडींमध्ये लहान मुले, महिला यांची संख्या अधिक होती़ या अपघातातील पाच जणांची प्रकृती गंभीर असून, त्यामध्ये टेम्पो चालकाचाही समावेश आहे़ दरम्यान, अपघाताची माहिती कळताच आरोग्य उपसंचालक एल. घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी सर्व तयारी केली होती़ तसेच जखमींवरील उपचारासाठी चार शल्यचिकित्सक, तीन अस्थिरोगतज्ज्ञ, सहा परिचारिका, पंधरा प्रशिक्षणार्थी परिचारिका उपस्थित होते़अपघातातील जखमीसोनाली शिवाजी वाघमारे (२५), धोंडाबाई पुंडलिक भोई (५०), विमलाबाई गायकवाड (५०), हरि किसन गांगुर्डे (४५), अशोक छबू पवार (४५), गीता बाबुराव हांडगे (१७), विमल हरी गायकवाड (४५), राजश्री रामदास पवार (१०), सुमन रंगनाथ गायकवाड (५६), चांगूबाई हांडगे (३५), पूजा मधुकर गुंजाळ (१५), ज्ञानेश्वर हांडगे (१५), संतोष केशव गुंजाळ (१८), अनिता पवार (४०), हौसाबाई यशवंत गुंजाळ (४०), साहेबराव गुलाब पवार (२४), अमोल राजाराम पवार (१२), छाया मधुकर गुंजाळ (२५), सुमनबाई माळी (३७), राणीबाई बाळू जाधव (२८), सुंदराबाई गोधडे (६५), चांगुलाबाई बाबुराव हांडगे (३५), ईश्वरी दीपक माळी (साडेतीन महिने), दीपाली दीपक माळी (२८), द्रौपदा नंदू पिंपळे (४०), रोहित अशोक पवार (१४), आबा देवराम शेलार (५५), काळू किसन माळी (५५), आशा संजय बडे (२७), रोहिणी पवार (१४), सगुणा बाबुराव बर्डे (६०), विजय मधुकर गुंजाळ (१८), सागर सुका बेंडकुळे (२२), भाग्यश्री संजय बडे (५४), वैष्णवी संजय बडे (५४), पुष्पा जाधव (४४), रुपा पिंपळे (२५), सिंधू राजाराम पवार (५६), यमुनाबाई भाऊसाहेब घाडगे (५०), हौसाबाई पवार (३०), काळूबाई गुंजाळ (४०).