शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची चोरटी वाहतुक करणारे ३७ डंपर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 16:00 IST

नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील वाळू सम्राट तापी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करत आहेत.या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर सापळा रचून तब्बल ३७ वाळूचे डंपर पकडण्यात आले.

सटाणा-ताहाराबाद रस्ता : सटाणा तहसील आणि पोलिसांची संयुक्त कारवाईसटाणा : नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील वाळू सम्राट तापी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करत आहेत.या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर सापळा रचून तब्बल ३७ वाळूचे डंपर पकडण्यात आले. सटाणा तहसील आणि जायखेडा पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली. पकडलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून पस्तीस ते चाळीस लाख रुपये दंड वसूल होईल असे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले.बनावट परवाने छापून तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी केली जात आहे. ही वाळू नाशिक ,मुंबईकडे चढ्या भावाने विक्र ी करण्याचे मोठे रॅकेट नंदुरबार , नाशिक जिल्ह्यात कार्यरत आहे. ही चोरटी वाहतुक गेल्या काही दिवसांपासून अधिक जोमाने सुरु असल्याने वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रांत प्रवीण महाजन , तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुधाकर राठोड ,विनोद चव्हाण ,जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या विशेष पथकाने सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील करंजाड जवळ सापळा रचण्यात आला.यावेळी वाळूने भरलेले तब्बल ३७ डंपरचा ताफा हॉटेल शाहूच्या मैदानावर थांबल्यावर पथकाने छापा टाकला.यावेळी डंपर क्र मांक (एमएच १५ डीके ७२००) यावरील चालक डंपर पळवून नेऊन पसार झाला.महसूल विभागाने त्या डंपर चालक व मालका विरु द्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.या पथकाने उर्वरित वाळूचे डंपर सटाणा तहसील आवारात जमा करून अधिकृत परवान्याची तपासणी केली.