शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

३६ हजार नवीन मिळकतींची नोंद

By admin | Updated: June 22, 2017 00:37 IST

नाशिक : महापालिकेने शहरात सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात आतापर्यंत २ लाख ९ हजार मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्यात तब्बल ३६ हजार नवीन मिळकतींची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने शहरात सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात आतापर्यंत २ लाख ९ हजार मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्यात तब्बल ३६ हजार नवीन मिळकतींची नोंद झाली आहे. याशिवाय, वाढीव बांधकामेही निदर्शनास आली आहेत. नवीन मिळकतींची नोंद झाल्याने महापालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून सुमारे ५० कोटी रुपयांचा वाढीव महसूल मिळणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.महापालिकेने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतचे काम नवी दिल्ली येथील जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या कंपनीला सहा महिन्यांसाठी देण्यात आले आहे. सदर कंपनीने १९ डिसेंबर २०१६ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला प्रारंभ केला. सध्या महापालिकेच्या दप्तरी चार लाख दहा हजार मिळकतींची नोंद आहे. जिआॅग्राफिकल सर्व्हेच्या माध्यमातून त्यात १५ ते २० टक्के मिळकतींची संख्या वाढण्याची अपेक्षा महापालिकेला आहे. सर्व्हेमध्ये प्रामुख्याने वाढीव बांधकामे, अनधिकृत बांधकामे, वापरात बदल, भाडेकरू, टॅक्सनेटमध्ये नसलेल्या मिळकती यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मागील महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत मिळकत सर्वेक्षणाच्या प्रगतीबद्दल सभापतींनी विचारणा केली असता उपआयुक्त दोरकुळकर यांनी संबंधित एजन्सीला १८० दिवसांची मुदत सर्वेक्षणासाठी दिलेली असून, संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचा खुलासा केला होता. त्यानुसार, बुधवारी (दि.२१) आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी मिळकत सर्वेक्षणाचा आढावा घेतला. त्यात आतापर्यंत १ लाख ६७ हजार मिळकतींचा प्रत्यक्ष सर्व्हे झाला असून, त्यात १ लाख ३१ हजार जुन्याच मिळकती आहेत तर नव्याने ३६ हजार मिळकतींची नोंद झालेली आहे. त्यामुळे महापालिकेला या मिळकतींच्या घरपट्टीच्या माध्यमातून सुमारे ५० कोटी रुपयांचा वाढीव महसूल प्राप्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय, सर्वेक्षणात काही वाढीव व अनधिकृत बांधकामेही निदर्शनास आली आहेत. त्याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.