शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम, पाटबंधारे आणि पशुसंवर्धन कर्मचार्‍यांच्या ३५ बदल्या

By admin | Updated: May 20, 2014 00:33 IST

आरोेग्यच्या ७६ बदल्या; विनंती बदल्यांमध्ये कर्मचार्‍यांची नाराजी

आरोेग्यच्या ७६ बदल्या; विनंती बदल्यांमध्ये कर्मचार्‍यांची नाराजीनाशिक : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या धामधुमीत रविवार व सोमवार मिळून १११ कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. त्यात रविवारी आरोग्य कर्मचार्‍यांच्या ७६, तर बांधकाम, पशुसंवर्धन व लघु पाटबंधारे विभागाच्या ३५ बदल्यांचा समावेश आहे.रविवारी आरोग्य विभागातील आरोग्यसेविका व औषधनिर्माता या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. त्यात ६४ आरोग्यसेविकांच्या प्रशासकीय, तर चार आरोग्यसेविकांच्या विनंती बदल्या झाल्या. त्याचप्रमाणे औषधनिर्माता या संवर्गातील आठ प्रशासकीय बदल्या झाल्या. आरोेग्यसेविकांच्या विनंती बदल्यांमध्ये काही महिला कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. मालेगावहून कळवणची मागणी केलेली असताना प्रत्यक्षात पेठ तालुक्यात बदली करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लघु पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता संवर्गातील सहा प्रशासकीय व दोन विनंती अशा एकूण आठ बदल्या झाल्या. त्याचप्रमाणे बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील एक विनंती बदली करण्यात आली, तर प्रशासकीय बदल्यांमध्ये पाचही कर्मचार्‍यांनी नकार दिलेला असताना एका कर्मचार्‍याची समतोल राखण्यासाठी बदली करण्यात आली. कनिष्ठ अभियंता संवर्गातील पेसा (आदिवासी) क्षेत्राबाहेर तीन प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या, तर बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात आठ बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. पशुसंवर्धन विभागातील जागा रिक्त नसल्याने सहायक पशुधन विकास अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत, तर पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील पेसातून बाहेर तीन प्रशासकीय, तर आदिवासी भागात नऊ प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. त्याचप्रमाणे पेसा क्षेत्रात दोन विनंती बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. बदल्यांची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, कार्यकारी अभियंता विष्णू पालवे, अनिल अहिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)इन्फो..ऑनलाइन बदल्यांचे आदेश कागदावरचमागील तीन वर्षांपासून कर्मचार्‍यांच्या बदल्यांची कार्यवाही करताना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी बदल्यांची कार्यवाही झाल्याबरोबर लगेचच कर्मचार्‍याच्या हाती नियुक्ती झालेल्या ठिकाणचा बदली आदेश समुपदेशनाच्या वेळी दिला होता. यावर्षी मात्र अर्थ, सामान्य प्रशासन, कृषी, आरोग्य, बांधकाम, लपा, पशुसंवर्धन अशा अनेक विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या; मात्र यातील बहुतेक कर्मचार्‍यांना बदल्यांचे आदेशच प्राप्त झालेले नाहीत. ऐनवेळी त्यात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे.