शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार ६४१ मतदार बजावणार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 22:50 IST

मालेगाव : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष संक्षीप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा मतदार संघात ३५ हजार ६४१ नव मतदारांची नोंदणी झाली आहे.

ठळक मुद्दे२४ हजार ७७८ नवीन मतदारांची नोंदणी केली.

मालेगाव : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष संक्षीप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा मतदार संघात ३५ हजार ६४१ नव मतदारांची नोंदणी झाली आहे.आगामी निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मतदानाचा हक्क नवमतदार बजावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोंबर दरम्यान विशेष संक्षीप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवीन मतदारांना नाव नोंदण्याचे आवाहन करण्यात आले होते. बीएलओंनी ३१ आॅक्टोबर या अखेरच्या दिवसापर्यंत काम केल्यामुळे मतदार संख्या उद्दीष्टपूर्ती झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत नवीन नाव नोंदणी, नाव रद्द करणे, दुरूस्ती व स्थलांतर आदि स्वरुपाचे अर्ज भरुन घेण्यात आले. बाह्य मतदार संघासाठी ३०८ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी नवीन नाव नोंदणीचे १० हजार ८६३ अर्ज भरुन घेतले. मध्य मतदार संघासाठी १३ हजार ९११ नाव नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २२३ बीएलओंनी उद्दीष्टाच्या पुढे जाऊन २४ हजार ७७८ नवीन मतदारांची नोंदणी केली.मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात नाव रद्द करण्याचे अर्ज १३२, दुरूस्ती अर्ज ६६५ तर स्थलांतरण अर्ज १८४ प्राप्त झाले तर मध्य विधानसभा मतदार संघात नाव रद्द करण्याचे २९, दुरूस्ती अर्ज २८९, स्थलांतरण अर्ज २०७ प्राप्त झाले होते. निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार जगदीश निकम, धमेंद्र मुल्हेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाºयांनी नाव नोंदणी व अर्जांची प्रक्रिया पार पाडली.