शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

व्यापारी बॅँकेसाठी ३४ टक्के मतदान

By admin | Updated: June 26, 2017 00:12 IST

नाशिकरोड : नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या मतदानात ३४.६३ टक्के इतके मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या मतदानात ३४.६३ टक्के इतके मतदान झाले. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ११ मतदान केंद्रांवर अंत्यत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवारी सकाळी ८ वाजता जेलरोड येथील के. एन. केला हायस्कूलमध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. व्यापारी बैठक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ सहकार व प्रतिस्पर्धी श्री व्यापारी पॅनलमध्ये सरळ लढत होती. सहकार पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे व श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर करीत आहेत. दत्तमंदिर रोड येथील मनपा शाळा क्रमांक १२५ मध्ये ७८८० मतदार असून, त्यापैकी २७१४ इतके मतदान झाले. आर्टिलरी सेंटररोड संत आनंदऋषी शाळेत ५७२३ पैकी २१८१, के. एन. केला हायस्कूल केंद्रावरील ११४९१ पैकी ४४७७, चेहडी मनपा शाळेतील केंद्रावर ६५९० पैकी ३३२८, नेहरूनगर मनपा शाळा ५००९ पैकी १४१६, कॅन्टोन्मेट हायस्कूल ४५०६ पैकी १७९४, जि.प. शाळा भगूर येथे ४३४३ पैकी २०८९, केबीएच विद्यालय, सिडकोत ३१३३ पैकी ६०१, व्ही. एन. नाईक महाविद्यालय नाशिकमध्ये ८१३९ पैकी ११५०, वाजे हायस्कूल, सिन्नर येथे २१०७ पैकी ८८६, स्वामी विवेकानंद विद्यालय, इंदिरानगर येथे २४७६ पैकी ६२८, असे एकूण ६१ हजार ३९७ पैकी २१ हजार २६४ मतदान झाले. रविवारी सकाळी ८ वाजता मतदानप्रक्रियेला सुरुवात झाली. मनपा शाळा क्रमांक १२५, संत आनंदऋषी शाळा, के. एन. केला हायस्कूल, चेहडी, देवळाली कॅम्प,