शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

३०० किलो वांग्याचे भरीत अन् बाजरीच्या भाकरी

By admin | Updated: December 16, 2015 22:52 IST

चंपाषष्ठी : प्रतिजेजुरी मऱ्हळमध्ये सात गावांचे भाविक जागरण गोंधळात तोडणार एकच लंगर

शैलेश कर्पे सिन्नरप्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्द येथील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. परिसरातील सात गावांचे भाविक मंदिरात जागरण-गोंधळ घालणार असून, एकच लंगर तोडला जाणार आहे. गाव व परिसरातील भाविकांना महाप्रसाद वाटण्यासाठी ३०० किलो वांग्याचे भरीत व सुमारे २५०० बाजरीच्या भाकरी करण्याची तयारी सुरू आहे.सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्द येथे माघ पौर्णिमेला म्हणजे साधारणत: फेबु्रवारी महिन्यात मोठी यात्रा भरते. त्याचबरोबर येथे चंपाषष्ठी उत्सवही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गुरुवारी सायंकाळी ७ वाजता खंडेराव महाराजांची आरती व रात्री ८ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महाप्रसाद म्हणून वांग्याचे भरीत व बाजरीची भाकरी करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रूक, सुरेगाव, पांगरी, निऱ्हाळे, कणकोरी, फुलेनगर या सुमारे सात गावांतील भाविक यावेळी होणाऱ्या सामुदायिक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमास उपस्थित राहातात. सुमारे दीड ते दोन हजार भाविकांच्या उपस्थितीत पहाटे लंगर तोडण्याचा कार्यक्रम पार पडतो. एकच जागरण-गोंधळ व लंगर तोडण्याच्या कामाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोंधळी म्हणून पाटपिंप्री येथील तर जागरणी म्हणून निमगाव-गुळवंच येथील मंडळ हजेरी लावणार आहे. सुमारे दीड ते दोन हजार भाविकांच्या महाप्रसादासाठी ३०० किलो वांग्यांचे भरीत व सुमारे २५०० भाकरी बनविण्यात येणार आहेत. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात जागरण- गोंधळ व लंगर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. उत्सव पार पाडण्यासाठी मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रूक, सुरेगाव व पांगरी येथील ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.