शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

गोदाघाटावर ३०० जीवरक्षक तैनात

By admin | Updated: August 23, 2015 23:50 IST

सेवापर्वणी : भारत सेवाश्रम संघाचा उपक्र

मनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात विविध सामाजिक संस्था, संघटना उपक्रम राबवित आहेत. त्यात भारत सेवाश्रम संघाने रुग्णांना मोफत उपचारासह भाविकांचे पुरासारख्या आपत्ती परिस्थितीत प्राण वाचविण्यासाठी ३०० जीवरक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती संघाचे महामंत्री स्वामी विश्वात्मानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात पाण्यात बुडणाऱ्या ४५ भाविकांचे जीव वाचविण्यात संघाच्या जीवरक्षक स्वयंसेवकांना यश आले होते. तसेच पंढरपूरला संघाच्या जीवरक्षकांनी ३७०० भाविकांचे प्राण वाचविले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संघातर्फे नियुक्त करण्यात आलेले जीवरक्षक समुद्रात पोहणारे असून, ते पूर्ण प्रशिक्षित असतात. २० सप्टेंबरपर्यंत सदर संघाचे जीवरक्षक घाटावर सेवा देणार आहेत. सध्या संस्थानचे ३५० स्वयंसेवक याठिकाणी येऊन पोहचले आहेत. १०० वर्षांपेक्षा जास्त काळापासून संघ सेवेचे कार्य करीत आहे. सन १९१७ मध्ये स्वामी प्रणवानंद यांनी संघाची स्थापना केली. सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रण स्वयंसेवकही संघातर्फे रात्रं-दिवस असणार आहेत. पूर, वादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीत संघाचे स्वयंसेवक सदैव तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विश्वशांती महायज्ञास प्रारंभ झाला आहे. सकाळी पूजन करून स्वामी माधवानंद महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच या संघाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी स्वामी भास्करानंद यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते.