शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

दिंडोरी वसतिगृहातील ३० विद्यार्थिनींना उलट्या, जुलाब

By admin | Updated: September 29, 2015 00:18 IST

दिंडोरी वसतिगृहातील ३० विद्यार्थिनींना उलट्या, जुलाब

दिंडोरी : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागांतर्गत दिंडोरी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहामधील ३० शालेय विद्यार्थिनींना उलट्या व जुलाबाचा त्रास झाला. यापैकी १६ मुलींचा दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य १४ मुलींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.या वसतिगृहातील दोन मुलींना रविवारी (दि. २७) उलट्या-जुलाबांचा त्रास झाला असता त्यांना प्रथम खासगी दवाखान्यात उपचार घेण्याचा प्रयत्न केला. इतर मुलींना त्रास सुरू झाल्याने सोमवारी (दि. २८) रोजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उलट्या व जुलाब कशामुळे झाले याचे कारण समजू शकले नाही. आदिवासी विकास विभागाचे आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात नवे व जुने अशा दोन्ही विभागांत एकूण २१४ मुली राहतात. या मुलींनी रविवारी सकाळचा नास्ता केला. त्यानंंतर दोन मुलींना उलट्या व जुलाब झाले. या मुलींना खासगी रुग्णालयात उपचार केले, परंतु तद्नंतर अन्य मुलींनादेखील उलट्या व जुलाब त्रास होऊ लागल्याने वसतिगृहातच औषध उपचार केले. मात्र सोमवारी संख्या वाढतच गेली असता ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी सूर्यवंशी व तालुका वैद्यकीय अधिकारी ढाके यांनी मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. १६ मुलींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. १४ मुलींना प्राथमिक उपचार करण्यात आले.वसतिगृहातील शिजवलेल्या अन्नाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे. पोलीस निरीक्षक संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते, कॉ. वाघेरे, शेलार, भरसट, लो. ह. खेडकर पगारे आदि याबाबत तपास करत आहे. सुनीता पाडवी, वैशाली गायकवाड, अर्चना गायकवाड, अश्विनी गांगुर्डे, भारती चारोस्कर, शोभा उगले, हर्षदा झिरवाळ, रोहिणी गांगुर्डे, सुरेखा गायकवाड, देवकी धूम, सरला धोंगडे, सुनीता राऊत, संगीता पालवे, छाया गावंडे, नमिता गावंडे, रंजना धूम या मुलींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)