शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

तीस कोटींच्या पीककर्जाचे वाटप?

By admin | Updated: May 25, 2017 02:03 IST

नाशिक : जिल्हा बॅँकेकडे कर्जफेड करणाऱ्या सभासदांना सुमारे ३० कोटींचे पीक कर्जवाटप केल्याचा दावा जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने खरीप पीक कर्ज वाटपाचा विषय वादात असतानाच जिल्हा बॅँकेकडे कर्जफेड करणाऱ्या सभासदांना सुमारे ३० कोटींचे पीक कर्जवाटप केल्याचा दावा जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी केला आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या रिक्त असलेल्या कार्यकारी संचालक पदावर राज्य शिखर बॅँकेचे व्यवस्थापक राजेंद्र बकाल यांची नियुक्ती अधांतरी सापडल्याचे वृत्त आहे. राजेंद्र बकाल यांना नियुक्त करण्यासाठी जिल्हा बॅँकेचा मासिक बैठकीचा ठराव लागणार असून, अद्याप जिल्हा बॅँकेची मासिक बैठकीची तारीखच जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी निश्चित न केल्याने जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्तीबाबत राजेंद्र बकाल यांचे भवितव्य अधांतरी राहिल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात मुंबईला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांची एक तातडीची बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हा बॅँकेच्या पीक कर्ज वसुलीसाठी राज्य शिखर बॅँकेकडून राजेंद्र बकाल यांच्या रूपाने जिल्हा बॅँकेला कार्यकारी संचालकपदी नियुक्ती देण्याचे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले होते. त्यासाठी जिल्हा बॅँकेचा ठराव मागितला होता. प्रत्यक्षात जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक नसल्याने हा ठराव तातडीने सहकार विभागाला जिल्हा बॅँकेला पाठविता आलेला नाही. ज्या शेतकरी सभासदांनी १५७ कोटींच्या पीक कर्जाची परतफेड केली आहे त्यातील काही सभासद शेतकऱ्यांना खरिपासाठी जिल्हा बॅँकेकडून सुमारे ३० कोटींचे पीक कर्ज वाटप केल्याचा दावा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.