शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरुपदासाठी जगन्नाथ दीक्षित, मोहन खामगावकर यांच्यासह ३० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांना ...

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू निवडीसाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत कुलगुरुपदासाठी देशभरातील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत तब्बल ३० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले असून, यात विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर व मधुमेहमुक्त भारत अभियानाचे प्रणेते तथा औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचाही समावेश आहे.

माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ नोव्हेंबर २०२० झालेल्या विद्यापीठ अधिकार मंडळाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या संयुक्त बैठकीत नूतन कुलगुरू निवडीसंदर्भात चर्चा झाल्यानंतर निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संंस्थेतर्फे २२ जानेवारी २०२१ रोजी संकेतस्थळ व प्रसिद्धीमाध्यमांत जाहिरातीद्वारे कुलगुरुपदासाठी २४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवले होते. त्यानंतर ही मुदत ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. या कालावधीत देशभरातून कुलगुरुपदासाठी अर्ज वैद्यकीय क्षेत्रातील ३० इच्छुक तज्ज्ञांनी अर्ज केले आहे. यात प्रामुख्याने पुण्यातील सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालयातील डॉ. सचिनकुमार पाटील, नवीन पारगाव येथील तात्यासाहेब कोरे दंतवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य हरीश कुलकर्णी, जयसिंगपूर येथील जेजेएमएएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद बुद्रुक, अमरावतीच्या डॉ. पी. डी. एम. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा. पुष्पा जुंगारे, मुंबईतील सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालय तथा केईएम रुग्णालयाचे प्रा. हरीश पाठक, राष्ट्रीय जनआरोग्य व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत, सैन्य रुग्णालयाचे वैद्यकीय सेवा महासंचालक लेफ्टनंट जनरल अशोक हुडा यांच्यासह विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर व मधुमेहमुक्त भारत अभियानाचे प्रणेते तथा औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक जगन्नाथ दीक्षित, आदी ३० इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे कक्ष अधिकारी संजीव ललवाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.