शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३ शिक्षकांना ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 17:55 IST

इगतपुरी : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन एॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, देण्यात येणारा ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०१८’ नाशिक जिल्ह्यातील ३ शिक्षकांना जाहीर झाला असून, त्यामध्ये राज्यातील ५३ शिक्षकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देराज्यातील ५३ शिक्षकांचा या राज्यस्तरीय पुरस्कारात समावेश

इगतपुरी : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन एॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, देण्यात येणारा ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०१८’ नाशिक जिल्ह्यातील ३ शिक्षकांना जाहीर झाला असून, त्यामध्ये राज्यातील ५३ शिक्षकांचा समावेश आहे.पुरस्कारार्थीमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत हे अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली जाते.राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या ५४ शिक्षकांमध्ये नाशिक जिल्ह्यातील कनाशी ता. कळवण येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे माध्यमिक शिक्षक मधुकर घायदार, आसखेडा ता. बागलाण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक जयवंत ठाकरे आणि पांढरी वस्ती ता. चांदवड येथील जि. प. शाळेच्या प्राथमिक शिक्षक वैशाली सूर्यवंशी यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण दि. ६ व ७ आॅक्टोबर रोजी सोलापूर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स’ मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून राष्ट्रीय स्तरावरील या कॉन्फरन्स’मध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे.