शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ३२ संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:26 IST

नाशिक : शहरात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेची वैद्यकीय विभागाची चक्रे वेगाने फिरली आहेत.

नाशिक : शहरात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेची वैद्यकीय विभागाची चक्रे वेगाने फिरली आहेत. त्यात विविध भागांतील ३२ संशयित रुग्ण शुक्रवारी (दि.१७) महापालिकेच्या रुग्णालयासह खासगी रुग्णालयात आढळले आहे, तर याच परिसरातील ४४ नागरिकांना सर्दी, खोकला, ताप असा त्रास होत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयाकडे संदर्भित करण्यात आले आहे.  नाशिक शहरात सुरुवातीला एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र, नंतर विविध भागांत पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आधीच सतर्क असलेल्या महापालिका प्रशासनाने पुढील कार्यवाही युद्धपातळीवर सुरू केली आहे. बाधित रुग्णांच्या परिसरातील पाचशे मीटर ते तीन किलोमीटर अंतराचे क्षेत्र सिल केल्यानंतर या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी शहरात ७५ वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आली आहेत. शुुक्रवारी (दि.१७) वैद्यकीय पथकांनी ४ हजार ६६१ घरांना भेटी दिल्या आणि १७ हजार ४१४ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यात अलीकडे आढळलेल्या बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरात कोरोनाप्रमाणेच आजाराची लक्षणे असलेले ४४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्वांना अधिक तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, तर अन्य ३२ जणांमध्ये सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळल्याने त्यांना माहापालिका आणि अन्य खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यात ३0 जणांना मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात, तर दोन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक