शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व जागांसाठी २८४ उमेदवार रिंगणात आरोग्य विद्यापीठ : विविध प्राधिकरण मंडळ निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:07 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध जागांसाठी उमेदवारांच्या अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात छानणी करण्यात आली असून, यामध्ये सर्व जागांसाठी एकूण २८४ उमेदवार पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देसहा महसूल विभागांतून ५५ उमेदवार पात्र तत्सम विद्याशाखेचे १३ उमेदवार पात्र उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध जागांसाठी उमेदवारांच्या अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात छानणी करण्यात आली असून, यामध्ये सर्व जागांसाठी एकूण २८४ उमेदवार पात्र ठरले आहेत.विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व नाशिक या सहा महसूल विभागांतून एकूण ५५ उमेदवार पात्र आहेत. यात मुंबई विभागासाठी १०, पुणे विभागासाठी १५, औरंगाबाद विभागासाठी १३, नाशिक विभागासाठी ०६, नागपूर विभागासाठी ०७, अमरावती विभागासाठी ०४ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेचे एकूण १३ उमेदवार पात्र आहेत. यात वैद्यकीय विद्याशाखेसाठी एकही उमेदवार पात्र नसून, दंत विद्याशाखेसाठी ०१, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेसाठी ०८, होमिओपॅथी विद्याशाखेसाठी ०१, तर तत्सम विद्याशाखेसाठी ०३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अभ्यासमंडळाकरिता वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांचे एकूण १८० उमेदवार असून, यामध्ये वैद्यकीय विद्याशाखेसाठी २९, दंत विद्याशाखेसाठी १८, आयुर्वेद विद्याशाखेसाठी ९५, होमिओपॅथी विद्याशाखेसाठी २९, नर्सिंग विद्याशाखेसाठी ०६, आॅक्युपेशनल आणि फिजिओथेरपी विद्याशाखेसाठी ०३ उमेदवार वैध ठरले आहेत. प्राध्यापक वगळता शिक्षक गटात निवडणुकीकरिता वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांचे एकूण ३६ उमेदवार पात्र असून, यात वैद्यकीय विद्याशाखेसाठी ०५, दंत विद्याशाखेसाठी ०९ आयुर्वेद व युनानी विद्याशाखेसाठी १२, होमिओपॅथी विद्याशाखेसाठी ०१, तर तत्सम विद्याशाखेसाठी ०९ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र आहेत. निवडणुकीसाठी वैद्य आणि अवैध नामनिर्देशन अर्जांचे अनुषंगाने संबंधितांना हरकत घ्यावयाची असल्यास दि. १२ ते १४ पर्यंत संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत विद्यापीठ मुख्यालयात लेखी स्वरूपात अर्ज सादर करता येणार आहे. या अनुषंगाने प्राप्त हरकतीवर दि. १५ रोजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर सुनावणी करतील. या निवडणुक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत २० डिसेंबर सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे.