शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेत २७६ भाविक अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:41 IST

नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देखराब हवामान : भाविक सुरक्षित असल्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्वाळा

नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.२८ जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, नाशिकचे भाविक मातोश्री ट्रॅव्हल्सच्या वतीने २९ जून रोजी जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून वादळ, पाऊस व भूस्खलनामुळे यात्रा खंडित होत असल्याने नाशिकचे काही भाविक मागे-पुढे झाले आहेत. अमरनाथ गुंफेजवळ १०२ भाविक कालपासून शिबिरात अडकले आहेत. तर अन्य भाविक बालटालच्या लष्कराच्या शिबिरात सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भाविकांचे भ्रमणध्वनी बंद झाल्याने त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क तुटल्यामुळे काळजी व्यक्त केली जात होती. सुरक्षिततेचा प्रश्न दरवर्षी उत्तर भारत, अमरनाथ, कैलास मानसरोवर, दक्षिण भारतात हजारो भाविक यात्रेकरू नाशिकमधून रवाना होत असतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतात नैसर्गिक आपत्तीच्या घटना पावसाळ्यात घडू लागल्या असून, त्यातून भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. ढगफुटी, भूस्खलन, महापुराच्या घटनांमध्ये भाविक अडकून पडल्याचे प्रकारही अनेकवेळा घडले आहेत.