शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात  २६ टॅँकर मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:24 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिलेला असला तरी, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख लिटर दूध संकलन करण्यात आले असून, २६ दूध टॅँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दूध संकलन केंद्रांना पोलीस बंदोबस्त हवा असेल तो देण्याची तयारी ठेवण्यात आली असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिलेला असला तरी, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख लिटर दूध संकलन करण्यात आले असून, २६ दूध टॅँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दूध संकलन केंद्रांना पोलीस बंदोबस्त हवा असेल तो देण्याची तयारी ठेवण्यात आली असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.  या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्णातील दूध संघ प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. जिल्ह्णात दरदिवशी १ लाख ३० हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते त्यापैकी ५० हजार लिटर दुधाचा पुरवठा नाशिक शहरासाठी केला जातो व उर्वरित दूध मुंबईला पाठविले जाते. त्यापार्श्वभूमीवर दूध टॅँकर रवाना करण्यासाठी दूध संघांनी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधावा तसेच दूध वाहतुकीचे वेळापत्रक प्रशासनाकडे दिल्यास या वाहनांना तत्काळ पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले.  आंदोलकांनी धमक्या अथवा आततायीपणा करण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यांना कळविण्यात यावे, मात्र कोणत्याही परिस्थितीत संकलन बंद करू नये, असे निर्देशही त्यांना देण्यात आले.  नाशिक जिल्ह्णात सोमवारी सर्वच केंद्रांवर दूध संकलन नियमितपणे करण्यात आले असून, सायंकाळपर्यंत २६ टॅँकर रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नाशिक व नगर जिल्ह्णात ४७ दूध संकलन केंद्रे असून, नगरचे दूधही नाशिकमार्गेच रवाना केले जाते याशिवाय जळगाव, धुळे जिल्ह्णातील दूधही नाशिकमार्गेच जात असल्याने त्या दृष्टीने पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  या बैठकीत दूध संकलन, वाहतूक, विविध दूध संघांकडून होणाºया दैनंदिन वाहतूक आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, दुग्धविकास अधिकारी श्रीकांत शिपूरकर आदी उपस्थित होते.नोडल अधिकारी नियुक्तीच्या सूचनाया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याबरोबरच दूध संकलन संस्थांना पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, त्यासाठी दूध संघांनी नोडल अधिकाºयांची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास ०२५३-२३१७१५१ किंवा २३१५०८० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठा