नाशिक : नाशिक डिस्ट्रिक्ट सेंकडरी टीचर्स पतसंस्थेच्या १८ जागांसाठी ७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, रविवारी (दि.२) सकाळी ८ ते ४ या वेळेत जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर त्यासाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी दिली.रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी (दि. ३) सकाळी ८ वाजता द्वारका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.जिल्ह्णातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या अनुषंगाने महत्त्वाची समजली जाणाऱ्या एनडीएसटी अर्थात माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची मानली जात आहे. चार पॅनलमधील ७२ उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होणार असून चार अपक्षही नशीब आजमावत आहेत. रविवारी (दि.२) जिल्ह्णात या निवडणुकीसाठी २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रत्येकी चार ते पाच कर्मचारी याप्रमाणे २६ मतदान केंद्रांवर १०० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. नाशिकला पाच, मालेगावला तीन, कळवण, बागलाण, निफाड, दिंडोरी व येवला तालुक्यात प्रत्येकी दोेन इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर,सिन्नर, दवड, नांदगाव, सुरगाणा, देवळा तालुक्यात प्रत्येकी एक अशी २६ मतदान केंद्रे आहेत.(प्रतिनिधी)
माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी २६ मतदान केंद्रे
By admin | Updated: August 1, 2015 00:29 IST