शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वावी विकास संस्थेत १३ जागांसाठी २६ उमेदवार रिग्ांणात

By admin | Updated: August 21, 2016 00:49 IST

चुरशीची निवडणूक : १२ जणांची माघार; दोन पॅनलमध्ये लढत

सिन्नर : तालुक्यातील वावी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व उपसरपंच विजय काटे यांच्या सत्ताधारी गटाच्या विरोधात सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठलराव राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. काटे व राजेभोसले या दोन परस्परविरोधी पॅनलमध्ये आमने-सामने चुरशीची लढत रंगणार आहे. विकास संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत दोघांचे अर्ज अवैध ठरले होते. ३८ उमेदवारांपैकी माघारीच्या शेवटच्या दिवशी १२ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी सुरेखा वाजे, मारुती घेगडमल, जगन्नाथ रसाळ, रामनाथ गलांडे, भीमराव काटे, संदीप भोसले, रतनबाई ताजणे, अशोक मालपाणी, सदाशिव गोराणे, दत्तात्रय नवले, दिनकर वेलजाळी व महम्मदरफीक इनामदार यांनी माघार घेतली. महिला राखीव गटात दोन जागांसाठी मंदा भागवत वैराळ, कल्पलता कारभारी वेलजाळी, यमुनाबाई पांडुरंग नवले व ताराबाई कचरु शिंदे यांच्यात लढत होत आहे. इतर मागास प्रवर्गात संजय रामनाथ वेलजाळी व ज्ञानेश्वर पंढरीनाथ गलांडे यांच्यात समोरासमोर सामना होत आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती गटात सोमनाथ केदू कांदळकर व जनार्दन भानुदास रहाटळ यांच्यात लढत होत आहे. अनुसूचित जाती व जमाती गटात नवनाथ तुकाराम घेगडमल व रामदास मल्हारी घेगडमल आमनेसामने आहेत. ५३८ सभासद संख्या असलेल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी रविवार (दि. २८) रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर ताबडतोब मतमोजणी केली जाणार आहे. माघारीपूर्वीच दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला होता. (वार्ताहर)