शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हिना पांचालसह २५ संशयितांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

--- नाशिक : जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा इगतपुरी तालुक्यात दोन आलिशान बंगल्यांत मागील आठवड्यात अमलीपदार्थांच्या सेवनासह रंगलेली हवाइयन रेव्ह पार्टी ...

---

नाशिक : जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा इगतपुरी तालुक्यात दोन आलिशान बंगल्यांत मागील आठवड्यात अमलीपदार्थांच्या सेवनासह रंगलेली हवाइयन रेव्ह पार्टी नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा मारून उधळून लावली होती. या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालसह सर्व २५ संशयितांना आज बुधवारी (दि. ७) जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या संशयितांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत केलेल्या कारवाईत बॉलिवूड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकूण २२ तरुण-तरुणींकडून गांजा, हुक्का, चरस, कोकेन यांसारख्या मादक अमलीपदार्थांचे सेवन केले जात असल्याचे आढळून आले होते. या दोन दिवसीय हवाईयन रेव्ह पार्टीची कुणकुण पोलिसांना लागताच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने गेल्या शनिवारी मध्यरात्री रेव्ह पार्टी उधळली होती. या छाप्यात पोलिसांनी अभिनेत्री हिना पांचालसह एकूण २२ संशयितांना स्काय ताज, स्काय व्हिला या बंगल्यांमधून रंगेहाथ ताब्यात घेतले होते. यानंतर या गुन्ह्यात नायजेरियन ड्रग्ज विक्री करणारा नायजेरियन पीटर उमाहीदेखील पोलिसांच्या हाती लागला. एकूण संशयितांची संख्या २७ वर पोहोचली. त्यापैकी २५ संशयितांना पोलिसांनी अटक करून वेळोवेळी न्यायालयात हजर करीत पोलीस कोठडी मिळविली. पोलिसांनी काही संशयितांविरुद्ध प्रथमदर्शनी कोटपा, दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला तर काही संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई केली.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळनंतर बुधवारी पुन्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. नाईक - निंबाळकर यांच्या विशेष कोर्टात सर्व २५ संशयितांना दुपारी हजर करण्यात आले. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

----इन्फो----

दोन संशयित आठवड्यापासून फरारच

रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज पुरविणाऱ्या संशयित सराईत गुन्हेगार नायजेरियन उमाही पीटरच्या संपर्कातील दोन संशयित अद्यापही ग्रामीण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्या मागावर पोलिसांची पथके असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कोठून आणि कसे मिळविले याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. पीटर याच्याविरुद्ध यापूर्वीही काशिमीरा पोलीस ठाण्यात अमलीपदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आलेला आहे.

---इन्फो---

ड्रग्ज फेकले स्विमिंग पूलमध्ये

पोलिसांनी छापा मारल्याचे लक्षात येताच संशयितांनी चरस, कोकेनसारखे ड्रग्ज बंगल्यातील स्विमिंग पूलमध्ये फेकल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. स्विमिंग पूलमध्ये किती प्रमाणात ड्रग्ज फेकले? याचा तपास केला जात आहे. वैज्ञानिक न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकाकडून याबाबत पडताळणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या सर्व संशयितांच्या रक्त, लघवीच्या नमुन्यांची तपासणी केली जात असून, त्यांच्या अहवाल येणे बाकी आहे.