शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपाच्या २५ कर्मचाऱ्यांची बडतर्फी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:15 IST

मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे किशोर बोर्डे यांनी घेतल्यानंतर शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाºया व गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर असणाºया सुमारे २५ ते ३० स्वच्छता कर्मचाºयांना बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत, तर नवीन १४ स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

मालेगाव : महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे किशोर बोर्डे यांनी घेतल्यानंतर शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाºया व गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर असणाºया सुमारे २५ ते ३० स्वच्छता कर्मचाºयांना बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत, तर नवीन १४ स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. ४४ फवारणी यंत्रचालक व ३५ बीट मुकादम स्वच्छता विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे शहर स्वच्छतेच्या कामात गती येणार आहे.संबंधित कर्मचारी आठ दिवसात हजर झाला नाही तर त्यांना नोटीस देऊन बडतर्फ केले जाणार आहे. दैनंदिन हजेरी अहवालातून हा प्रकार उघडकीस आला. महापालिकेच्या कचरा डेपोवरील १६ कर्मचाºयांपैकी काही कर्मचारी स्वच्छता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागात ७ स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत. नवीन १४ स्वच्छता निरीक्षकांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असून असे २१ स्वच्छता निरीक्षक स्वच्छता विभागात कार्यरत राहणार आहे.३५ बीट मुकादम व ४४ फवारणी यंत्रचालक स्वच्छता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे. फवारणीचा खाजगी ठेका दिला जाणार आहे. या बदलामुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागात सुमारे ११० कर्मचाºयांची भर पडणार आहे. तर वारस हक्काचे शंभर कर्मचारी घेतले जाणार आहे. कर्मचाºयांच्या वाढत्या संख्येमुळे शहर स्वच्छतेच्या कामामुळे गतीमानता येणार आहे. सुलभ व सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरूस्तींचे टेंडर काढण्यात येणार आहे.शहरात डुकरांच्या वाढलेला सुळसुळाटामुळे नागरिकांना त्रास होत होता. सध्या महापालिकेकडून डुक्कर पकडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.आयुक्तांनी घेतली गंभीर दखलगेल्या काही दिवसांपासून शहर स्वच्छतेच्या तक्रारी वाढल्या होत्या. महापालिका आयुक्त बोर्डे यांनी स्वच्छतेप्रश्नी गंभीर दखल घेतली आहे. गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सतत गैरहजर असणाºया २५ ते ३० कर्मचाºयांवर कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद