नाशिक : जिल्ह्यात पोर्टलवरील नोंदी अपडेट करण्याचे काम गुरुवारपासून आठवडाभर सुरूच असून, गत सात दिवसांत तब्बल २४०० बळींची वाढ झाली आहे. अवघ्या आठवडाभरात वाढलेल्या या बळींमुळे आठवडाभरात एकूण बळींचा आकडा पाच हजारांवरून साडेसात हजारांवर पोहोचला आहे.
पोर्टलवर बळी अपडेट करण्याच्या नावाखाली या वाढीव विलंबित बळींची संख्या अवघ्या आठवडाभरात इतक्या वेगाने वाढल्याने मृत्युदराची सरासरी नक्की कशी काढावी, असा प्रश्न आकडेतज्ज्ञांना पडू लागला आहे. गत आठवड्यात गुरुवारपासून ही प्रलंबित आकडेवारी पोर्टलवर अपडेट करण्याच्या कामाला प्रारंभ झाला. त्यानंतर दररोज पोर्टलवर टाकली जाणारी बळींची नोंद डोळे चक्रावून टाकणारी ठरत आहे.
इन्फो
विलंबित बळी पहिल्या लाटेच्या दुप्पट
जिल्ह्यात गुरुवारी तब्बल २७०, शुक्रवारी २१४, शनिवारी ३३३, रविवारी ५१०, सोमवारी १५१,मंगळवारी २८४, तर बुधवारी २६७, तर गुरुवारी ३०० अशा प्रकारे एकूण २३९० बळींची नोंद करण्यात आली आहे. अद्यापही काही प्रमाणात ही बळीसंख्या वाढत राहणार असल्याचेच संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत नोंद न झालेल्या आणि तथाकथित पोर्टलवर अपडेट करण्याच्या नावाखालील बळींचा हा आकडा पहिल्या लाटेतील बळींपेक्षाही दुपटीहून अधिक असल्याचेच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत तिप्पट घातक ठरल्याचेच त्यातून दिसून आले.
इन्फो
१२ महिन्यांचे बळी व सात दिवसांतील अपडेटेड बळी समान
जिल्ह्यात गतवर्षी एप्रिलपासून बळी जाण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी पहिल्या लाटेतील सर्वाधिक बळी सप्टेंबरमध्ये होते. त्या पार्श्वभूमीवर गत वर्षाच्या एप्रिलपासून बळी गेलेल्या नोंदींची आकडेवारी पाहणे उद्बोधक ठरते. त्यात एप्रिल (१२ बळी ), मे (३६० बळी ), जून (१६६ बळी), जुलै (२६१ बळी), ऑगस्ट (३७१ बळी), सप्टेंबर (४९८) ऑक्टोबर (३०० बळी), नोव्हेंबर (१२१ बळी), डिसेंबर (१७७ बळी), जानेवारी (८३ बळी), फेब्रुुवारी (५४ बळी) , मार्च (२८७ बळी) या १२ महिन्यांतील बळींच्या नोंदीची गोळाबेरीज ही २३९० येते, तर गत आठवडाभरातील अपडेटेड बळींची नोंद साधारण तेवढीच आल्याने वर्षभराचे बळी एका बाजूला आणि पोर्टलवरील अपडेटेड सात दिवसांचे बळी समान भरत आहेत.
---------------------------------------------
ग्राफसाठी आकडे
गुरुवारी २७०, शुक्रवारी २१४, शनिवारी ३३३, रविवारी ५१०, सोमवारी १५१, मंगळवारी २८४ तर बुधवारी २६७, गुरुवारी ----
एप्रिल २०२० (१२ बळी ), मे (३६० बळी ), जून (१६६ बळी), जुलै (२६१ बळी), ऑगस्ट (३७१ बळी), सप्टेंबर (४९८) ऑक्टोबर ( ३०० बळी), नोव्हेंबर (१२१ बळी), डिसेंबर (१७७ बळी), जानेवारी (८३ बळी), फेब्रुुवारी (५४ बळी), मार्च २०२१ (२८७ बळी)
------------------------