शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडून २४ लाखांची लूट

By admin | Updated: August 10, 2014 02:03 IST

एटीएम फोडून २४ लाखांची लूट

 

सिन्नर : शहराच्या मध्यवर्ती भागातील बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी २४ लाख ४३०० रुपयांची चोरी केली. महिन्याभरात चोरट्यांनी दुसरे एटीएम मशीन फोडण्याचे धाडस केल्याने खळबळ उडाली आहे.येथील चौदा चौक वाड्याच्या सांगळे कॉम्प्लेक्समध्ये बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले. सकाळी ९ वाजेच्या सुमारास कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात सदरची घटना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या मशीनमध्ये गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास १७ लाख रुपये टाकण्यात आले होते, तर अगोदरचे सात लाख रुपये या मशीनमध्ये शिल्लक होते अशी एकूण २४ लाख ४३०० रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. पोलिसांनी श्वानपथक पाचारण केले होते. तथापि, पावसामुळे श्वानाला चोरट्यांचा माग काढता आला नाही, ठसे तज्ज्ञांकडून ठसे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. (पान २ वर)मात्र त्यात त्यांना यश आले नाही.इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट अ‍ॅण्ड सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीकडून या एटीएम मशीनची देखभाल केली जाते. तर या मशीनमध्ये रक्कम टाकण्याचे काम आयएसएस एसडीबी या सिक्युरिटी प्रायव्हेट कंपनीतर्फे केले जाते. त्यामुळे बँकेचा या एटीएम मशीनशी तसा कोणताही संबंध येत नाही.एटीएम मशीनमध्ये असणाऱ्या दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरांना चोरट्यांनी काळ्या रंगाचा चिकट टेप चिकवला होता. त्यापूर्वीचे फुटेज व आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही माहिती मिळते का, यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक के.डी. राठोड, हवालदार नितीन मंडलिक, रवींद्र वानखेडे, प्रवीण गुंजाळ तपास करीत आहेत. (वार्ताहर)