नाशिक : कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या वतीने नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मंगळवारी (दि.१७) अर्ज दाखल केला. माघारीच्या अंतिम दिवशी एकूण २४ उमेदवारांनी ३९ अर्ज दाखल केले असून बुधवारी अर्जांर्ची छाननी होणार आहे.डॉ. सुधीर तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पाटीदार भवन येथे आघाडीच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय बहाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉँग्रेसच्या वतीने डॉ. सुधीर तांबे यांनी पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे दाखल केला. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. १० ते १७ जानेवारी दरम्यान एकूण २४ उमेदवारांनी ३९ अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)
सुधीर तांबे यांच्यासह २४ उमेदवारांचे अर्ज दाखल
By admin | Updated: January 18, 2017 00:48 IST