नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २० हजार ०२० वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ८ हजार ३६६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १६४६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.७४ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.३१, नाशिक ग्रामीण ९६.०९, मालेगाव शहरात ९२.८४, तर जिल्हाबाह्य ९४.०६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ५४ हजार ११४ असून, त्यातील ३ लाख ४० हजार २५९ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १२ हजार ०२० रुग्ण बाधित आढळून आले असून, १ हजार ८३५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात २३४ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST