शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी २३ जनावरे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

मालेगाव : कत्तलीच्या हेतूने जनावरांची वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या गोवंश विशेष पथकाने वेगवेगळ्या कारवाईत २३ जनावरे ...

मालेगाव : कत्तलीच्या हेतूने जनावरांची वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या गोवंश विशेष पथकाने वेगवेगळ्या कारवाईत २३ जनावरे व वाहने जप्त केली आहेत. पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळदे शिवारात पोलिसांनी छापा टाकून २ लाख ४३ हजार रूपये किमतीची ११ जनावरे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार भाऊसाहेब ताडीस यांच्या फिर्यादीवरुन आसीफ दस्तगीर रा. गुलशेरनगर याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कमालपुरा भागात पोलिसांनी छापा टाकून १ लाख १५ हजार रूपये किमतीची चार जनावरे व पिकअप क्रमांक एमएच ४३ एडी ५९५ असा एकूण ३ लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शाकीब अहमद मोहंमद शाहीद याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार चंद्रशेखर शिरोळे यांनी फिर्याद दिली आहे. तर आयेशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इस्लामपुरा भागात कत्तलीच्या हेतूने जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेख आरिफ शेख शकूर, शारिक निसार शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन कोळी यांनी फिर्याद दिली आहे. कत्तलीच्या हेतूने जनावरे जखडून बांधून ठेवत पिकअप क्रमांक एमएच ०२ वायए ५९६४ मधून १ लाख ५० हजार रूपये किमतीची ८ जनावरे आढळून आली. पोलिसांनी जनावरे व पिकअप असा ४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

----

क्रीडा संकुलासमोरून दुचाकी लंपास

मालेगाव : येथील स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलासमोरून अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किमतीची दुचाकी चोरून नेली आहे. याप्रकरणी शेख जावेद फतेह यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १८ एके ७९२२ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास हवालदार आर. एम. पाटील हे करीत आहेत.

----

दुकानाचे शटर तोडून ५५ हजार लंपास

मालेगाव : चाळीसगाव फाट्यावरील इलेक्ट्रिक दुकानाचे शटरचे कुलूप तोडून ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या अकबर इस्माईल शेख, रिजवान रसूल शेख यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण विलास सावंत या दुकान मालकाने फिर्याद दिली आहे. त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून इलेक्ट्रिक साहित्य व ५० हजार रूपये किमतीची रिक्षा क्रमांक एमएच १५ वाय २३३६ ही चोरून नेली आहे. पुढील तपास हवालदार एस. बी. बच्छाव हे करीत आहेत.

----

विवाहितेचा छळ; तिघांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : दुचाकी घेण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राणी शरद खुराडे या विवाहितेने फिर्याद दिली आहे. शरद गोरख खुराडे, रामकृष्ण खुराडे, अनुसयाबाई गोरख खुराडे यांनी शारीरिक व मानसिक छळ करुन शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार एच. टी. खांडेकर करीत आहेत.

----

मालेगावी तरुणाचा मोबाईल लंपास

मालेगाव : येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नवीन बसस्थानक परिसरात तरुणाच्या खिशातील २० हजार रूपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी रोहित बाबूलाल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा २० हजार रूपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेला आहे. पुढील तपास हवालदार बी. आर. निकम करीत आहेत.

-------------

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे शिवारातून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या देविदास उत्तम पवार रा. देवळाणे, ता. मालेगाव याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलीला काही तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.