सिन्नर : सिन्नर मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे डांबरीकण, दुरु स्ती व मोरी बांधणे आदी कामांसाठी २०१८-१९ या चालू वर्षात २२ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांसाठी नवीन आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करण्यासाठी आमदार वाजे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध होणार आहे. यात सिन्नर ते अकोले-दापूर, चापडगाव मार्गे जाणारा राज्यमार्ग क्रमांक ३२वर गेल्या वर्षात काही प्रमाणात काम करण्यात आले. उर्वरित कामांसाठीही यंदाच्या आर्थिक वर्षात ८९ लाख २५ हजार रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे-मºहळ- वावी, सोमठाणे-पंचाळे-पांगरी-मºहळ-दोडी-दापूर-हिवरे-ठाणगाव, ब्राह्मणवाडे-नायगाव, सिन्नर-डुबेरे-समशेरपूर, अधरवड-टाकेद ते नगर हद्दीपर्यंत, सिन्नर-जायगाव-नायगाव, निमगाव-सिन्नर-गुळवंच-देवपूर ते पंचाळे यातील काही मार्गांची पुनर्बांधणी, दुरुस्ती व डांबरीकरण होणार आहे. हरसुले-सोनांबे ते कोनांबे, धोंडबार मार्गासाठीही तब्बल तीन कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे.
सिन्नरच्या रस्त्यांसाठी २२ कोटी ५५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:37 IST