शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर अभियंत्यांकडून २२़४६ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:18 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : घरझडतीतील कारवाई; पोलीस कोठडीची मागणी करणार नाशिक : शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांच्या घरझडती व पोलीस कोठडीतील कालावधीत २२ लाख ४६ हजार १९४ रुपयांची मालमत्ता शोधून काढली आहे़ विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केवळ एकाच अभियंत्याचे बँक लॉकर शोधण्यात यश आले असून, उर्वरित दोघांचे बँकेत खातेच नव्हते का? स्थावर मालमत्तेचे काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत़

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : घरझडतीतील कारवाई; पोलीस कोठडीची मागणी करणार

नाशिक : शासकीय ठेकेदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांच्या घरझडती व पोलीस कोठडीतील कालावधीत २२ लाख ४६ हजार १९४ रुपयांची मालमत्ता शोधून काढली आहे़विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केवळ एकाच अभियंत्याचे बँक लॉकर शोधण्यात यश आले असून, उर्वरित दोघांचे बँकेत खातेच नव्हते का? स्थावर मालमत्तेचे काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत़सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय ठेकेदार युवराज मोहिते यांनी पूर्ण केलेल्या रस्ता दुरुस्ती कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, सहायक अभियंता सचिन पाटील व शाखा अभियंता अजय देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले़ या तिघांपैकी पवार यांच्या घरझडतीत रोख रक्कम व सोने मिळून आठ लाख २० हजार ६९४ रुपयांचा, पाटील यांच्या घरझडतीत रोख रक्कम व सोने मिळून सहा लाख सात हजार ४५० रुपयांचा, तर देशपांडे यांच्या घरझडतीत ८ लाख ७ हजार ९३३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़लाचखोर अभियंत्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (दि़१७) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़मंगळवारी या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे़ यावेळी तपासासाठी आणखी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे़यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन अधीक्षक शशिकांत महावरकर यांनी कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व जगदीश वाघ यांची कोट्यवधी रुपयांची अपसंपदा शोधून काढली होती, तर सद्यस्थितीत अटक करण्यात आलेल्या तिन्ही अभियंत्यांपैकी केवळ एकाचे लॉकर सापडले असून, त्यांचे बँक खाते, लॉकर व स्थावर मालमत्तेचा शोध लावण्यात यश आलेले नाही़ त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासापद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे़अभियंता पवार यांच्याकडे सात लाखांचे सोनेसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार यांच्या घरझडतीत सहा लाख ४५ हजार १९४ रुपयांचे सोने, तर एक लाख ७५ हजार ५०० रुपयांचे रोख रक्कम आढळून आली असून, रोख रकमेपेक्षा सोन्याचे प्रमाण अधिक आहे़उपअभियंता पाटील यांचे सोने लॉकरमध्येसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन प्रतापराव पाटील यांच्या घरझडती तसेच कुटुंबीयांच्या केलेल्या चौकशीत कॅनडा कॉर्नरवरील शिरपूर पिपल्स को-आॅप़ बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार बँकेतील लॉकरची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये १७ तोळे सोने आढळून आले़शाखा अभियंत्यांकडे चांदीची भांडी अधिकशासकीय ठेकेदार युवराज मोहिते यांच्याकडून तीन लाखांची लाच स्वीकारणारे शाखा अभियंता अजय देशपांडे यांच्या घरझडतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल चार किलो ७२६ गॅ्रम वजनाची चांदीची भांडी व ६ लाख १४ हजार २०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली़लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही अभियंत्यांची घरझडती घेण्यात आली असून रोख रकमेसह सोने चांदी जप्त करण्यात आले आहेत़ याबरोबरच आरटीओ तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांकडे पत्र पाठवून स्थावर मालमत्तेचा शोध घेतलाजाणार आहे़ मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपणार असून, न्यायालयाकडे तपासासाठी कायदेशीरदृष्ट्या पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची विनंती केली जाणार आहे़- डॉ़ पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक