शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘मेगा ड्राईव्ह’मध्ये २२ लाखांची दंडवसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:42 IST

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट व सीटबेल्ट ड्राईव्हद्वारे मंगळवारी (दि़१२) ५ हजार ३६५ बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करून २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली आहे़

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट व सीटबेल्ट ड्राईव्हद्वारे मंगळवारी (दि़१२) ५ हजार ३६५ बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करून २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली आहे़पोलीस आयुक्त सिंगल यांच्या आदेशान्वये मंगळवारी संपूर्ण शहरात एकाचवेळी ५२ ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली़ वाहनचालकांवरील कारवाईप्रसंगी वादविवाद होऊ नये यासाठी व्हिडीओ कॅमेरे व बॉडी वॉर्न कॅमेरे लावण्यात आले होते़ पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºया ३ हजार ९५१ वाहनचालकांवर कारवाई करून १९ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला़ तर सीटबेल्ट न वापरणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १ हजार ४१४ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करून २ लाख ७१ हजार रुपयांची दंड वसूल केला़शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहर वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते़वाहतूक नियम तसेच हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणाºया वाहनचालकांवर कारवाई सुरूच राहणार आहे़ या मोहिमेत बहुतांशी वाहनचालक हे हेल्मेटचा वापर न करता ते डिक्कीत अथवा वाहनाच्या आरशाला लावत असल्याचे आढळून आले असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे़ या मोहिमेत शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, वकील अशा सर्वांवरच कारवाई करण्यात आली आहे़ दुचाकीस्वारांनी आपल्या स्वत:च्या व कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा़- डॉ़ रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक