शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘हेल्मेट ड्राईव्ह’मध्ये २२ लाखांची दंडवसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:43 IST

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट व सीटबेल्ट ड्राईव्हद्वारे मंगळवारी (दि़१२) ५ हजार ३६५ बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करून २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली आहे़पोलीस आयुक्त सिंगल यांच्या आदेशान्वये मंगळवारी संपूर्ण ...

ठळक मुद्दे५ हजार ३६५ बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट व सीटबेल्ट ड्राईव्हद्वारे मंगळवारी (दि़१२) ५ हजार ३६५ बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करून २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली आहे़

पोलीस आयुक्त सिंगल यांच्या आदेशान्वये मंगळवारी संपूर्ण शहरात एकाचवेळी ५२ ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली़ वाहनचालकांवरील कारवाईप्रसंगी वादविवाद होऊ नये यासाठी व्हिडीओ कॅमेरे व बॉडी वॉर्न कॅमेरे लावण्यात आले होते़ पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºया ३ हजार ९५१ वाहनचालकांवर कारवाई करून १९ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला़ तर सीटबेल्ट न वापरणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १ हजार ४१४ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करून २ लाख ७१ हजार रुपयांची दंड वसूल केला़शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहर वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते़

वाहतूक नियम तसेच हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणाºया वाहनचालकांवर कारवाई सुरूच राहणार आहे़ या मोहिमेत बहुतांशी वाहनचालक हे हेल्मेटचा वापर न करता ते डिक्कीत अथवा वाहनाच्या आरशाला लावत असल्याचे आढळून आले असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे़ या मोहिमेत शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, वकील अशा सर्वांवरच कारवाई करण्यात आली आहे़ दुचाकीस्वारांनी आपल्या स्वत:च्या व कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा़- डॉ़ रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक.