बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, वाडीवऱ्हे शिवारातील मोनियार रु फिंग प्रा.लिमिटेड कंपनीच्या ३२ कामगारांनी कामावर पुन्हा रूजू करण्यासाठी पुकारलेल्या आमरण उपोषणाच्या एकविसाव्या दिवशी कंपनी व्यवस्थापन कामगारांच्या मागण्यांबाबत उदासीन असल्याचे चित्र निर्माण झाले असून, येथील ३२ कामगारांना रोजगारासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ तोडगा काढून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी उपोषणकर्तेे मोहन महाले, विनोद महाले, शरद कोठुळे, दत्तू गायकर, सुरेश कातोरे, नितीन आरोटे, सुदाम कातोरे, किरण कोठुळे, समाधान कातोरे, तुकाराम महाले, बहिरू कडलग, माणिक कातोरे, किरण गाडेकर, सचिन महाले, प्रकाश महाले, तुकाराम नाठे, शांताराम मातेरे, विष्णू धोंगडे, गोरख धिंडाळे आदिंनी केली आहे. रोजगार मिळावा या मागणीसाठी कंपनीच्या कामगारांनी २१ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे; मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधींना या बेरोजगारांच्या प्रश्नाचे गांभीर्य राहिले नसून व्यवस्थापनाने उत्पादन सुरु ठेवले आहे. (वार्ताहर)
मोनियार रु फिंग कामगारांच्या उपोषणाचा २१वा दिवस
By admin | Updated: January 31, 2017 01:37 IST