येवला : येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या २१ सदस्यांच्या एकत्रित वाढदिवसानिमित्त येवला शहर पोलीस ठाणे व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील होते.येवला शहर पोलीस ठाणे येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्र मात श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे माधव मोरे, दिनकर कंदलकर, गणपत वाघुंबरे, सुधाकर सुताणे, भास्कर जाधव, रामनाथ माळी, अश्विन जाधव, राजेंद्र आहेर, दिलीप पाटील यांच्यासह ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक सत्काराचे आयोजन केले होते. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासमवेत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापण्यात आला. ज्येष्ठांना बेस्ट करण्यासाठीचा कार्यक्रम सलग सहा वर्षांपासून येवला शहर पोलीस ठाणे राबवित आहे. संघाचे माजी अध्यक्ष श्यामसुंदर काबरा, गणपत वाघुंबरे, दिलीप पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या २१ सदस्यांच्या एकत्रित वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:11 IST