शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

२१८ कोटींच्या निविदा : मार्चच्या आतच कार्यादेश निघण्याची शक्यता रस्ते विकासकामांची हंडी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:53 IST

नाशिक : मागील दाराने जादा विषयांच्या माध्यमातून सुमारे २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांना मंजुरी दिल्याचे प्रकरण वादात अडकले आहे.

ठळक मुद्देरस्ते विकासकामांच्या खर्चाची तरतूद तरतूद नसताना रस्ते विकासाचा घाट

नाशिक : मागील दाराने जादा विषयांच्या माध्यमातून सुमारे २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांना मंजुरी दिल्याचे प्रकरण वादात अडकले असतानाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या कामांची निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. ७ फेबु्रवारीला निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षातच मार्चअखेर ठेकेदारांच्या हाती कार्यादेश पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकात सदर रस्ते विकासकामांच्या खर्चाची तरतूद करण्यात सत्ताधारी भाजपाने बाजी मारली असून, त्यामुळे स्पील ओव्हरही वाढणार आहे.शहरात गेल्या तीन वर्षांत रस्त्यांच्या कामांवर सुमारे सातशे कोटी रुपये खर्च करणाºया महापालिकेत मागील वर्षी सत्तेत आलेल्या भाजपाने २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांचा घाट घातला. महापालिकेच्या नाजूक परिस्थितीचे दाखले देणाºया आयुक्तांकडूनही सत्ताधारी भाजपाला साथ लाभली आणि मागील दाराने जादा विषयांच्या माध्यमातून २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकात तरतूद नसताना रस्ते विकासाचा हा घाट घातल्याबद्दल शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सर्वप्रथम थेट लेखीपत्र देत या प्रकाराला विरोध दर्शविला होता. त्यापाठोपाठ भाजपाचेच नगरसेवक कमलेश बोडके यांनीही घरचा अहेर देत विरोधाची भूमिका घेतली होती. कॉँग्रेस-राष्टÑवादीही या विरोधात सहभागी झाली, तर शिवसेनेची भूमिका संदिग्ध राहिली. महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखापरीक्षक यांनी या कामांबाबत निधी उपलब्ध करून देता येणार नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात या कामांचा समावेश राहणार नसल्याचे ठामपणे सांगत आयुक्तांनी पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातच त्याची तरतूद होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता सुधारित अंदाजपत्रकात या कामांसाठी तरतूद करण्यात येत असून, मार्चअखेरपर्यंत कार्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलपासून प्रत्यक्ष रस्त्यांवर डांबर पडण्यास सुरुवात होणार आहे.एमआयडीसी भागातही रस्तेमहापालिकेने एमआयडीसी परिसरातीलही रस्त्यांच्या कामांचा समावेश केला आहे. एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या कामांबाबत उद्योजकांकडून सातत्याने मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवरच एमआयडीसी परिसरात ८.८६ कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. प्रभाग ११ला दुहेरी लाभ होणार असून, प्रभागातील रस्त्यांसाठीही ६.२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागाला ७.५० कोटी रुपये याप्रमाणे रस्ते विकासाचा निधी मिळणार असून, एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे.विरोधकांचे ताबूत थंडावले२५७ कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामांना विरोधाची भूमिका घेणाºयांचे ताबूत आता थंडावले आहेत. माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर आणि माजी उपमहापौर गुरुमित बग्गा हे बॅकफूटवर आले आहेत, तर शिवसेनेसह कॉँग्रेस-राष्टÑवादीचाही विरोध मावळला आहे. सर्वच प्रभागांना निधी मिळणार असल्याने विरोधकांनी ही नरमाईची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. विरोधकांसह प्रशासनालाही गुंडाळण्यात सत्ताधारी भाजपा मात्र यशस्वी झालेली आहे.