शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर-पश्चिम विभागातील धार्मिक स्थळांवर कारवाई२१ अनधिकृत बांधकामे हटवली : किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:15 IST

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि.९) सातपूर आणि पश्चिम विभागातील २१ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली. किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली.

ठळक मुद्दे विश्वस्तांनी न्यायालयात जाण्याची तयारी चालविली धडक कारवाईला सुरुवातधार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त

सातपूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि.९) सातपूर आणि पश्चिम विभागातील २१ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली. किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली. दरम्यान, महापालिकेच्या या मोहिमेमुळे धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी पंचवटी, नाशिक पूर्व विभागातील काही विश्वस्तांनी न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि.८) सिडको विभागापासून महानगरपालिकेच्या अतिक्र मण विरोधी पथकाने धडक कारवाईला सुरुवात केली. गुरुवारी (दि.९) सातपूर विभागात सकाळी ९ वाजता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. मोहीम सुरू करण्यापूर्वी सातपूर पोलीस ठाण्यात मोहिमेतील पोलिसांचा फौजफाटा हजर झाला. महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मोहिमेचा आराखडा तयार केला. सुरुवातीला पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याच्या कडेला असणारी दोन धार्मिक स्थळे हटवून ही मोहीम महादेववाडीत गेली. तेथील दोन धार्मिक स्थळे हटविण्यात आली. त्यानंतर सातपूर कॉलनीत श्री छत्रपती विद्यालयालगतची तीन धार्मिक स्थळे, श्री सप्तशृंगी मंदिराजवळील दोन धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई पार पाडण्यात आली. जुन्या कॉलनीतील दोन धार्मिक स्थळे आणि श्रमिकनगर येथील एक धार्मिक स्थळ अशी एकूण १२ धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. धार्मिक स्थळांमधील मूर्ती काढण्यापूर्वी पुरोहिताच्या माध्यमातून विधिवत पूजन करून घेण्यात आले. त्यानंतर मूर्ती संबंधितांच्या हवाली करण्यात आली. दोन-तीन ठिकाणी झाडाखाली देवदेवतांच्या फोटोफ्रेम ठेवण्यात आल्या होत्या. त्या सुद्धा मोहीमेदरम्यान काढून घेण्यात आल्या. बहुतांश धार्मिक स्थळे हटविण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून सहकार्य केले. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने मोहीम शांततेत पार पडली. पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अतिक्र मण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.