शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्रगटदिनानिमित्त रंगली २१ तबलावादकाची जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:57 IST

नाशिक: उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे बुधवारी (दि. ७) श्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त २१ तबलावादकांच्या जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम भाविकांनी अनुभवला. नाशिक शहरात पहिल्यांदाच अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उंटवाडी परिसरात झालेल्या या कार्यक्रमात विविध वयोगटातील २१ तबलावादकांनी त्रितालातील कायदे, तुकडे, ताल दादरा हे राग तबल्यावर सादर ...

नाशिक: उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे बुधवारी (दि. ७) श्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त २१ तबलावादकांच्या जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम भाविकांनी अनुभवला. नाशिक शहरात पहिल्यांदाच अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उंटवाडी परिसरात झालेल्या या कार्यक्रमात विविध वयोगटातील २१ तबलावादकांनी त्रितालातील कायदे, तुकडे, ताल दादरा हे राग तबल्यावर सादर केले. गुरुवंदना परण व गणपतीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. रत्नाकर संत गुरुजींनी गजानन महाराजांची सायंकाळची आरती सादर केल्यानंतर तिलाही तबल्यावर साथ दिली. शहरातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गजानन महाराज सेवा परिवार दरवर्षी अशा स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करत आले आहे. दिगंबर सोनवणे, रसिक कुलकर्णी यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमास ‘अंर्तनाद’ असे नाव देण्यात आले होते. भाविकांनी टाळ्यांच्या गजरात सुरेल अशा सादरीकरणाला दाद दिली.दरम्यान प्रगटदिनानिमित्त सकाळपासून भाग्योदय अपार्टंमेट, कालिका पार्कजवळ सकाळी १० वाजता भालचंद्र संत यांच्या हस्ते श्रींची महापूजा, दुपारी महाआरती, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भक्तिसंध्या हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम राघवेंद्र अंकलगी, सावणी कुलकर्णी व नितीन जोशी यांनी सादर केला. तत्पुर्वी श्रीरंगावधून भजनी मंडळाच्या सदस्यांनी विविध भजने सादर केली. सायंकाळी ६ वाजता अंतर्नाद हा दिगंबर सोनवणे व रसिक कुलकर्णी यांच्या विद्यार्थी गणांचा २१ नवोदित तबलावादकांची जुगलबंदीचा कार्यक्रम रंगला. सायंकाळी ७.३० वाजता भावांजली हा भक्तिगीतांचा कार्यक्रम स्वरसाज विनोद कुलकर्णी, प्रसाद गोखले व सहकलाकार यांनी सादर केला. रात्री ९.३० वाजाता शेजारतीने कार्यक्रमाची सांगता झाली. धनंजय संत यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.