शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुदामातून २१ बोकड पळविणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST

याबाबत अधिक माहिती अशी, गुदामाचे कुलूप तोडून चोरट्याने गुदामातील ८४ हजार रुपयांचे २१ बोकड चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ...

याबाबत अधिक माहिती अशी, गुदामाचे कुलूप तोडून चोरट्याने गुदामातील ८४ हजार रुपयांचे २१ बोकड चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१८) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी इनोव्हा कारमधून (एम.एच०२बीजे २२४५) बोकड लांबविल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी गुन्हे शाेध पथकाला आदेशित करत गुन्ह्याचा छडा लावण्यास सांगितले. पोलिसांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत तपास चक्रे फिरविली. पोलिसांनी घोटी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तेथून मुंबईच्या दिशेने वरील क्रमांकाची कार जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. यामुळे चोरटे मुंबईच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण शाखेची मदत घेत मोबाइल क्रमांक ट्रेस करत मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने मुंब्रा गाठले. तेथून संशयित आसिफ रशीदउल्ला कुरेशी (३५, रा. खर्डीरोड, मुंब्रा) यास ताब्यात घेतले. पथकाने आसिफ याची कसून चौकशी केली असता कारमालक ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील असल्याचे समजले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने सातपूर येथून बोकड चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे १ लाख ९ हजार रुपये किमतीचे २६ बोकडही जप्त केले आहेत.