शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची २१ कोटींची कामे रद्द नाहीत

By admin | Updated: June 23, 2017 16:41 IST

विष्णू सावरांची सारवासारव:निधी नियमानुसारच वापरण्यासाठी आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या रस्त्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या २१ कोटींच्या रस्त्यांची कामे रद्द केलेली किंवा स्थगित केलेली नाहीत. फक्त हा निधी नियमानुसारच खर्च होतो आहे किंवा काय, याची तपासणी करण्याचे पत्र जिल्हा परिषदेला दिल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली.जिल्हा परिषदेला महिन्याभरापूर्वीच जिल्हा नियोजन मंडळाकडून २१ कोटींचा निधी रस्ते व पुलांच्या कामांसाठी वितरित करण्यात आला होता. या २१ कोटींच्या कामांना परस्पर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देण्यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत व सर्वसाधारण सभेत भाजपाचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे व राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तसेच दोन दिवसांपूर्वीच ही कामे रद्द करण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती. तसा दावाही उदय जाधव यांनी केला होता. या रस्ते मंजुरीच्या कामात घोळ असून, अनेक कामांना ग्रामीण मार्गाचे क्रमांकच नसल्याचे त्यांचे म्हणणे होेते. आता प्रत्यक्षात आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीच या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही किंवा संबंधित कामे रद्दही केलेली नसल्याचे सांगितले; मात्र ज्या कामासाठी निधी दिला, तीच कामे या निधीतून होत आहेत की नाही, कामे मंजूर करताना शासनाचे नियम-निकष पाळले गेले आहेत काय, हे तपासून पाहण्यासाठी संबंधित पत्र जिल्हा परिषदेला दिल्याचे विष्णू सावरा यांनी सांगितले.