शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

२०० पैकी दिले २०५ गुण

By admin | Updated: September 17, 2016 00:40 IST

आरोग्य विद्यापीठाचा घोळ : सारवासारव करण्यासाठी यंत्रणेची धावपळ

संदीप भालेराव  नाशिकआरोग्य विद्यापीठातील परीक्षा विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केल्यामुळे परीक्षा आणि निकाल यात कोणताही गोंधळ होत नसल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विद्यापीठाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला चक्क २०० गुणांपैकी २०५ गुण बहाल करण्याचा पराक्रम विद्यापीठाने केला असून लेखी परीक्षेतही संबंधित विद्यार्थ्याला १०० पैकी १२४ गुण देण्याची किमया विद्यापीठाने केली आहे.आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सध्याचे कामकाज अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध होत असल्याचे वारंवार सांगण्यात येते. विशेषत: परीक्षा विभागाने अनेक बदल करीत परीक्षा आणि निकाल यंत्रणेतील त्रुटी दूर करून बिनचूक कामकाज सुरू केल्याचा छातीठोक दावा परीक्षा नियंत्रकांकडून वारंवार केला जातो; मात्र एमबीबीएस प्रथम वर्ष निकालातील एका गुणपत्रकामुळे परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. मुंबईतील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला बायो केमेस्ट्री या विषयात २०० पैकी २०५ गुण गुणपत्रिकेत दर्शविण्यात आले आहेत. शिवाय लेखी परीक्षेतही संबंधित विद्यार्थ्याला १०० पैकी चक्क १२४ गुण देऊन विद्यापीठाने कळसच केला आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सदर बाब संबंधित विद्यार्थ्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने विद्यापीठाकडे त्याबाबतची तक्रार केल्यानंतर विद्यापीठ खडबडून जागे झाले. विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर संबंधितांनी दुरुस्ती करून त्यास सुधारित गुणपत्रक बहाल केले; मात्र या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये, अशी तंबीच संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयादेखील दिल्याचे समजते.सुधारित गुणपत्रकामध्ये विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १०० पैकी ७५ आणि एकूण गुण दोनशे पैकी १५६ गुण देण्यात येऊन दुरुस्ती करण्यात आली; मात्र हा सर्व अनागोंदी प्रकार केवळ एका विद्यार्थ्याच्या बाबतीत नसून काही विद्यार्थ्यांच्या निकालातही असा प्रकार घडल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे. विद्यापीठाच्या वरिष्ठांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना या प्रकरणाविषयी चर्चा न करण्याचे फर्मान सोडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यंत्रणेतील सुधारणेबाबत कितीही दावे केले जात असले तरी परीक्षेतील गोंधळाचे प्रकार सुरूच असून प्रॅक्टिकल्सच्या गुणांचा घोळ आणि परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याबाबत विद्यापीठाला अद्यापही यश आलेले नाही.