शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

वीस हजार चौरस फुटांची साकारली महारांगोळी

By admin | Updated: March 27, 2017 00:05 IST

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी गोदाकाठावर सुमारे १२५ महिलांनी अवघ्या दोन ते अडीच तासांत सुमारे वीस हजार चौरस फूट एवढ्या आकाराची महारांगोळी साकारली.

नाशिक : येत्या मंगळवारी गुढीपाडव्याचा सण साजरा होणार असून, हिंदू नववर्षालाही प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी गोदाकाठावर सुमारे १२५ महिलांनी अडीच तास परिश्रम घेत अवघ्या दोन ते अडीच तासांत सुमारे वीस हजार चौरस फूट एवढ्या आकाराची महारांगोळी साकारली.  रविवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता नारोशंकर मंदिराला लागून असलेल्या जुन्या भाजीबाजार पटांगणावर महारांगोळी रेखाटण्यास सुरुवात झाली होती. या उपक्रमाचे वैशिष्ट म्हणजे १२५ महिलांनी एकत्र येत आकर्षक रंगसंगतीचा खुबीने वापर करत ‘सामाजिक ऐक्य’ ही संकल्पनेवर आधारित वीस हजार चौरस फूट आकाराची (२०० बाय १०० फूट) महारांगोळी साकारली. यासाठी सुमारे ७ टन रांगोळीचा वापर करण्यात आला. या महारांगोळीमधून वारकरी सांप्रदायाचे दर्शन घडविण्यात आले. महारांगोळी साकारण्यास सुरुवात केली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत रांगोळी पूर्णत्वास आली होती. पहाटे सहा वाजेपासून उगवत्या दिनकराच्या साक्षीने यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, सिडकोच्या प्रशासक कांचन बोधले, परमहंस सद्गुरू वेणाभारती महाराज आदि उपस्थित होते. महाराजांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. दिवसभर ही महारांगोळी शहरामधील विविध व्हॉट््सअ‍ॅप ग्रुपमधून व्हायरल होत होती. अनेकांनी या महारांगोळीचे छायाचित्र ‘डीपी’ ठेवले होते. मागील वर्षीदेखील हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी १२५ बाय १०० फूट आकाराची रांगोळी साकारण्यात संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांना यश आले होते. महारांगोळी हे मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे नववर्षाच्या आरंभी सर्व समाजबांधवांना नवी ऊर्जा, नवी आशा मिळावी हा या उपक्रमांमागील उद्देश असल्याचे अध्यक्ष राजेश दरगोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अशी आहे महारांगोळीची संकल्पनासंत परंपरेमध्ये वारकरी सांप्रदायाचे अत्युच्च स्थान असल्याने सांप्रदायातील विविधता, परंपरा, सामाजिक ऐक्य, एकता, अध्यापन, विज्ञान यांचे चित्रण महारांगोळीच्या रेखाटनातून करण्यात आला होता. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकोबारायांपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी दिलेल्या जगत कल्याणाचा संदेशही या रांगोळीत देण्यात आला होता.