शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात आजाराची २०० जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 20:22 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूलजवळील जातेगाव येथे ग्रामस्थांचे हात, पाय सुजणे, दुखणे या अज्ञात आजाराने २०० हून अधिक ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून बाधा होत आहे. मात्र, तालुका आरोग्य प्रशासनासह जिल्हा आरोग्य प्रशासन अजूनही बेफिकीर असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा हलगर्जीपणा : जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूलजवळील जातेगाव येथे ग्रामस्थांचे हात, पाय सुजणे, दुखणे या अज्ञात आजाराने २०० हून अधिक ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून बाधा होत आहे. मात्र, तालुका आरोग्य प्रशासनासह जिल्हा आरोग्य प्रशासन अजूनही बेफिकीर असल्याचे दिसून येते.जातेगावकरांच्या जिवाशी आरोग्य विभागाने खेळ मांडला असून, जिल्हा प्रशासनाने संबंधित ठिकाणी तज्ज्ञ पथक पाठवून, त्यासबंधी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा दोन दिवसांत कोरोना काळात त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी सांगितले. जातेगाव (ता.त्र्यंबकेश्वर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांच्या हात, पायाला सूज, तसेच अंगदुखीच्या व्याधी जडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्राथमिक उपचारानंतर ही रुग्णांची अवस्था कायम आहे. त्यातच केंद्रात उपयुक्त पुरेशा उपाययोजना नसल्याने शेकडो ग्रामस्थ या अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावापासून बाधित झाले आहे. यामुळे ग्रामस्थांना या अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाचा मनस्वी मनस्ताप सहन करावा लागला आहे.तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने संबंधित बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, तालुका प्रशासन ही डोळेझाक करीत आहे. यामुळे दिवसेंदिवस येथे ग्रामस्थांच्या व्याधीत भर पडत आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यात आरोग्य विभागाच्या अनेक तक्रारी दिवसागणिक येत आहेत. त्यात उपकेंद्र नेहमीच बंद अवस्थेत, तर कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी यामुळे येथील आदिवासी बहुल भागात आरोग्यसेवेचा पुरता फज्जा उडाला आहे. जातेगाव येथील ग्रामस्थांना अज्ञात रोगांचा झालेला प्रादुर्भाव आरोग्य विभागाने दोन दिवसांत मनावर घेतला नाही, तर त्र्यंबकेश्वर किसान सभेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. होणाऱ्या परिणामास तालुका व जिल्हा आरोग्य विभाग जबाबदार असेल.- इरफान शेख, माकप जिल्हा सेक्रेटरी

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरhospitalहॉस्पिटल