वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ४ मीटर रूंद आणि २०० मीटर लांबीचा अद्ययावत फूटपाथ उभारला जाणार आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.वडांगळी विद्यालय हे पूर्व भागातील नामांकित विद्यालय असून, यात नर्सरीपासून बारावीपर्यंत दोन हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालय गावाबाहेर आणि ओझर-शिर्डी या राज्यमार्गावर येत असल्याने शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर येतात.जिल्हा परिषद सदस्य वैशाली खुळे यांच्या निधीतून १०० मीटर लांबीचा फूटपाथ मंजूर केला आहे. हा पादचारी मार्ग कमी असल्याचे उदय सांगळे यांनी विद्यालयास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता लक्षात आले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत निधी वाढवून २०० मीटर लांब फूटपाथचे काम करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे आणि सदस्य वैशाली खुळे यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वडांगळीच्या विद्यार्थ्यांसाठी २०० मीटरचा फूटपाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:58 IST
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ४ मीटर रूंद आणि २०० मीटर लांबीचा अद्ययावत फूटपाथ उभारला जाणार आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
वडांगळीच्या विद्यार्थ्यांसाठी २०० मीटरचा फूटपाथ
ठळक मुद्देजिल्हा परिषद सदस्य वैशाली खुळे यांच्या निधीतून १०० मीटर लांबीचा फूटपाथ मंजूर केला