शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे कोटींच्या धनादेशावर तोडगा?

By admin | Updated: June 10, 2017 01:04 IST

शुक्रवारी (दि. ९) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी तातडीची बैठक घेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे दोनशे कोटींचे धनादेश वटत नसल्याच्या प्रकरणी शुक्रवारी (दि. ९) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी तातडीची बैठक घेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना सूचना केल्या. याप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.१२) पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवारी (दि. ९) दुपारी एक वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी त्यांच्या कक्षात याप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, सहायक लेखा अधिकारी पी. डी. जाधव तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे आर. टी. शिंदे, विनायक माळेकर, चंद्रशेखर डांगे, मजूर सहकारी संस्था संचालक शशिकांत आव्हाड, सुरेश पांगारकर, सर्जेराव उगले आदी उपस्थित होते. गुरूवारी (८) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोेरात सभागृहात सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना व जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन यावर तोडगा न निघाल्यास सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची दखल घेत अध्यक्ष शीतल सांगळे यांनी त्यांच्या कक्षात बैठक घेऊन प्रशासनाला तत्काळ तोडगा काढण्याची सूचना केली. त्यावर याबाबत मार्गदर्शन मागविण्यासाठी मुख्य लेखा अधिकारी बोधिग्रहण सोनकांबळे मुंबईला गेल्याचे दीपककुमार मीना यांनी सांगितले.