शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार क्विंटल कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:13 IST

येथे शुक्रवारी कांद्याला किमान हजार रुपये, कमाल २२५०, तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर अंदरसूल उपबाजारात किमान ७०० रुपये, कमाल २३२४ तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

येवला : येथे शुक्रवारी कांद्याला किमान हजार रुपये, कमाल २२५०, तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर अंदरसूल उपबाजारात किमान ७०० रुपये, कमाल २३२४ तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. आवकेत वाढ सुरूच असून, दोन्ही ठिकाणी हजार ट्रॅक्टर आणि १८५ रिक्षांमधून सुमारे २० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कांद्याची आवक वाढली आहे.आगामी १६ आॅक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने इतर सुट्यावगळता केवळ नऊ दिवस कांदा मार्केट चालू राहणार आहे. चाळीत शिल्लक असलेला किमान दोन लाख क्विंटल कांद्यापैकी आगामी नऊ दिवसात किमान दीड लाख क्विंटल कांदा मार्केटला येण्याची शक्यता आहे. कांद्याचे बाजारदेखील २०० ते ५०० रुपयांनी वाढण्याची शेतकºयांना आशा आहे.कांदा खाणार भावउमराणा, मनमाड, चांदवड या डोंगराळ भागातील नवीन लाल कांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येऊ लागला की, उन्हाळ कांद्याचा भाव खाणे बंद होते. त्यानंतर लागलीच १५ नोव्हेंबरपासून येवला, वैजापूर, नांदगाव या भागातील नवीन लाल पोळ कांदा बाजारात येतो. सध्या मार्केटमध्ये असलेला गावरान कांदा केवळ महिनाभर भाव खाणार आहे. सध्या येवला बाजार समितीच्या आवारात सध्या मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. कांदा चाळीत साठवलेला कांदा आता खराब होऊ लागला आहे. त्यामुळे आता शेतकरी मार्केटला कांदा आणण्याची घाई करीत आहेत.दिवाळीनंतर शेतकºयांच्या चाळीत शिल्लक राहिलेला ५० हजार क्विंटल कांदा दिवाळीनंतर मार्केटमध्ये येईल. त्या दरम्यान कांद्याचा तुटवडा भासण्याची स्थिती राहील, त्यामुळे किमान ५०० ते ७०० रु पये क्विंटने भाव वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.