शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

२० जागांसाठी ४५९ अर्ज दाखल आज छाननी : पाच पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी दीडशे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:26 IST

२० जागांसाठी ४५९ अर्ज दाखलआज छाननी : पाच पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी दीडशे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवारी (दि.२६) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २० जागांसाठी ४५९ अर्ज दाखल झाले. त्यात पाच पदाधिकाऱ्यांच्या जागांसाठी १५४, तर १५ संचालक पदांसाठी ३०५ अर्ज दाखल झाले.गुरुवारी (दि. २७) अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अध्यक्ष प्रताप सोनवणे, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस नीलिमा पवार, संचालक शिरीषकुमार कोतवाल, डॉ. सुनील ढिकले, विश्राम निकम, डॉ. तुषार शेवाळे यांच्यासह काही आजी-माजी संचालकांचा समावेश आहे. आतापर्यंत दाखल अर्जांमध्ये विद्यमान सर्व पदाधिकारी व संचालकांसह माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, रायुकॉँ जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, माणिकराव बोरस्ते, नानासाहेब जाधव, मनोहर देवरे, दिलीप दळवी, उद्धव निरगुडे, बाळासाहेब पाटील, अशोक सावंत, डॉ. भाऊसाहेब मोरे, पांडुरंग सोनवणे, कैलास अहिरे, अरुण वाघ, दिलीपराव मोरे, शैलेश सूर्यवंशी, संदीप वाघ, प्रतापराव मोरे, देवराम मोगल, चंद्रभान बोरस्ते, सुनील देवरे, माजी नगरसेवक जे. टी. शिंदे, भगवंतराव बोराडे, कुमुदिनी पवार, उषा भामरे, शरद पाटील, डॉ. विलास बच्छाव, दत्तात्रय ढिकले, नारायण कोर, एन. डी. पवार, नामदेव महाले, भाऊसाहेब गडाख, राजेंद्र चव्हाणके, बाजीराव रकिबे, प्रल्हाद सोनवणे, संदीप वाघ, विजय पवार, राघो अहिरे, प्रशांत देवरे, यशवंत अहिरे, विजयकुमार निकुंभ, बाळासाहेब कोल्हे, अ‍ॅड. गंगाधर शिंदे, कोंडाजी चौधरी, भास्करराव पानगव्हाणे, भास्करराव पवार, पंडितराव भदाणे आदींचा समावेश आहे. प्रगती पॅनलच्या वतीने गुरुवारी दुपारी बारा वाजता पंडित कॉलनी येथून पदयात्रा काढून नीलिमा पवार यांच्यासह उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे पंडित कॉलनीत काहीशी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते. तर समाज विकास पॅनलच्या वतीनेही अध्यक्ष प्रताप सोनवणे व सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शुक्रवारी (दि. २८) उमेदवारी अर्जांची छाननी आहे. येत्या ३ आॅगस्टला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याच दिवशी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे.२७ पीएचजेएल-९३- प्रगती पॅनलच्या मेळाव्यात बोलताना नीलिमा पवार. समवेत रामचंद्र बापू पाटील, शांताराम अहेर, विनायक पाटील, शशिकांत पवार, दिलीप बनकर, शोभा बच्छाव, उत्तराताई सोनवणे आदी.