शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांकडील चिरीमिरीतून महापालिकेला ४० लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:58 IST

महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखूनदेखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरित करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमिरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीत गंभीर आरोप । सभापतींनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक : महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखूनदेखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरित करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमिरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे. एका बिगाऱ्याला दहा लाख रुपये, तर माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच ४० लाख रुपये जमा होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी समितीच्या शनिवारी (दि.१८) झालेल्या बैठकीत केला. याप्रकरणी सभापती उद्धव निमसे यांनी चौकशीचे आदेश देतानाच या विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचेही आदेश दिले आहेत.महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अयशस्वी ठरलेली फेरीवाला क्षेत्र आणि रस्त्यावरील वाढते अतिक्रमण या विषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी दिनकर पाटील यांनी फेरीवाला क्षेत्र असतानाही सोयीच्या ठिकाणी व्यवसाय करू देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माया जमा केली जात आहे. एक शिपायी जर दहा लाख रुपये जमा करीत असेल त्याची बदली कोण कशी काय करेल? असा प्रश्न केला. आपल्या प्रभागात शंभर फुटी मार्गावर वाहतुकीचा विचार न करता त्यावर मच्छी मार्केट आणि अन्य दुकाने थाटली असून, ती जाणीवपूर्वक हटविली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला, तर कल्पना पांडे यांनी आपल्या प्रभागातील अतिक्रमणांचा मुद्दा मांडतांना प्रशासनाला कळवूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला. संगीता जाधव यांनीदेखील पाथर्डी फाटा येथील अतिक्रमित बाजाराचा प्रश्न मांडला, तर सुषमा पगारे यांनी आपल्या प्रभागातील विक्रेत्यांना उपनगर येथे जागा देण्यात आली असून, तो नाशिकरोड विभागात असल्याने फेरीवाला क्षेत्र विकसित करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. समीर कांबळे यांनी आपल्या प्रभागात तिबेटीयन मार्केट तसेच डॉन बॉस्कोरोड येथील खाऊ गल्ली हे विक्रेते स्थलांतराचे यशस्वी प्रयोग राबविल्याचे सांगितले. सभापती उद्धव निमसे यांनी सदस्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे महामार्ग आणि रहदारीचे रस्ते सोडून अन्यत्र फेरीवाला क्षेत्र करावेत, ज्या ठिकाणी व्यवसाय होईल अशाच ठिकाणी फेरीवाला क्षेत्र करावे त्यासाठी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, असे सांगितले.मेनरोडबाबत आयुक्तांकडे बैठकअतिक्रमण निर्मूलन उपआयुक्त राहुल पाटील यांनी शहरात ५६ फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आले असून, ८० टक्के फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्यात आल्याचे नमूूद केले. शालिमार आणि मेनरोड येथील विक्रेत्यांच्या स्थलांतरासाठी आयुक्तराधाकृष्ण गमे यांच्याकडे दोन बैठका झाल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे उर्वरित ठिकाणी फेरीवाला क्षेत्र तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका