शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१४ ग्रामपंचायती अस्तित्वात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 23:16 IST

कळवण : विधानसभा मतदार संघातील कळवण तालुक्यातील पाच व सुरगाणा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात येणार आहे. यानंतर १४ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात येणार आहेत.

ठळक मुद्देकळवणच्या पाच, तर सुरगाण्यातील दोन ग्रामपंचायतींचे होणार विभाजन

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : विधानसभा मतदार संघातील कळवण तालुक्यातील पाच व सुरगाणा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात येणार आहे. यानंतर १४ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात येणार आहेत.जिल्हा परिषदेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून त्यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.कळवण व सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील ज्या आदिवासी गावांची लोकसंख्या एक हजारांहून अधिक असूनदेखील त्या गावांचा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. त्यामुळे आदिवासी गावे विकासापासून वंचित असल्याची ओरड होत होती. या गावातील आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायत विभाजनाची मागणी केली होती. शासन नियमानुसार पात्र असलेल्या गावामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येते. ग्रुप ग्रामपंचायत असेल तर त्यापासून विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती केली जात असल्यामुळे कळवण व सुरगाणा तालुक्यातील प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत आमदार नितीन पवार यांनी नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना केली होती.कळवण व सुरगाणा या आदिवासी तालुक्यांतील सात ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने १४ ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतींच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.या ग्रामपंचायतींचे होणार विभाजनकळवण तालुक्यातील पिंपळे बुद्रुकमधून सावरपाडा, मळगाव खुर्दमधून मळगाव बुद्रुक; दरेभणगीमधून धनेर दिगर; वाडी बुद्रुकमधून एकलहरे; नाळीद ग्रामपंचायतीतून भांडणे (पिंपळे) व इन्शी या दोन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे. सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या ग्रुप ग्रामपंचायतीतून चंद्रपूर, चिंचले, पांगारणे, सोनगीर, उदमाळ या नवीन; तर हट्टी ग्रामपंचायतीतून करवंदे, श्रीभुवन, मोठा माळ या तीन नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत