शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या मेनरोडच्या गणपती मंदिरात १२९ वा भाद्रपद गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 17:00 IST

विविध धार्मिक कार्यक्र मांसोबत विशेष युवा संगीत समारोह

ठळक मुद्देउत्सवाचा प्रारंभ सोमवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ‘श्रीं’चे मेनरोडने सवाद्य मिरवणुकीने आगमन होऊन प्राणप्रतिष्ठेने होईल

नाशिक : मेनरोड येथील गणपती मंदिरात १२९ वा भाद्रपद गणेशोत्सव दि. २ ते ७ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांसोबत विशेष युवा संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.उत्सवाचा प्रारंभ सोमवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ‘श्रीं’चे मेनरोडने सवाद्य मिरवणुकीने आगमन होऊन प्राणप्रतिष्ठेने होईल. मंगळवार दि.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभाकर श्रीकृष्णशास्त्री गोडशे आणि ब्रह्मवृंद यांचा वेदोक्त मंत्रजागर होईल. याच दिवशी रात्री ९.३० वाजता नाशिकच्या युवा गायिका आर्या गायकवाड आणि रिया पोंदेयांचे शास्त्रीय गायन होईल. यानंतर नाशिकचा उदयोन्मुख युवा तबलावादक कल्याण पांडे याचे स्वतंत्र तबलावादन होईल. बुधवार, दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता केतकी गोºहे यांचे सतारवादन होईल. तसेच अथर्व वारे यांचे स्वतंत्र तबला वादन होईल. गुरु वार , दि. ५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता श्री गणेश भक्त संगीत सेवा श्री चरणी रु जू होईल. शुक्र वार , दि. ६ सप्टेंबर रोजी, रात्री ९.३० वाजता राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त युवा तबलावादक प्रफुल्ल पवार याचे एकल तबलावादन होईल. तसेच पं. शंकरराव वैरागकर यांचे शिष्य अथर्व वैरागकर यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होईल. शनिवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सवाद्य मिरवणुकीने श्रींचे गोदाकाठी विसर्जन होईल. संपूर्ण उत्सव हा सर्वांसाठी खुला असून नाशिककर भाविक आणि संगीत प्रेमींनी कार्यक्र मांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक