शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

अठरा लाखांची फसवणूक; संशयितास कोठडी

By admin | Updated: July 19, 2014 01:09 IST

अठरा लाखांची फसवणूक; संशयितास कोठडी

वणी : छत्तीस गुंतवणूकदारांच्या अठरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुजरातच्या संशयिताला २१ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील छत्तीस गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या रकमेवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार वणी पोलिसांत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दिनेशभाई खजीभाई पटेल (गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. न्यायालयाने आज त्याला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. लखमापूर येथील संतोष सूर्यवंशी या एजंटाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे अठरा लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप पटेल यांच्यावर आहे. आस्था इंटरनॅशनल सुरत या कंपनीचा एजंट म्हणून काम करणाऱ्या दिनेश पटेल व संतोष सूर्यवंशी यांनी गुंतवणूकदारांना पैसे काढण्यासाठी सुरत येथील अ‍ॅक्सिस बॅँकेचे एटीएम कार्ड दिले होते. मात्र, पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड चालले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार कारभारी जयराम भोर यांनी दिल्यानंतर एटीएम कार्डचे उगमस्थान शोधण्यासाठी वणी पोलिसांचे पथक सुरत येथे गेले असता अ‍ॅक्सिस बॅँकेचे ते असल्याची माहिती मिळाली. मात्र, अधिकृत कागदपत्रांशिवाय ते कार्यान्वित होत नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, सुरत पोलिसांमध्ये आस्था कंपनी विरोधात ३ फेब्रुवारी २०१३ रोजी १६ गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुरत पोलिसांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून महत्त्वाची माहिती प्राप्त करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी संतोष सूर्यवंशी या पटेल याच्या सहकाऱ्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. (वार्ताहर)