शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाची मर्चंट बॅँकेच्या कचाट्यातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 01:22 IST

नाशिक : अठरा वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक मर्चंट बॅँकेच्या संचालक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या अवास्तव निवडणूक खर्चाच्या बालंटातून अखेर जिल्हा प्रशासन मुक्त झाले असून, या संदर्भात उच्च न्यायालय व त्यानंतर जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या वादात मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेला खर्च कसा योग्य होता हे न्यायालयाला पटवून देण्यास यश आल्याने प्रशासनाची कायद्याच्या कचाट्यातून सुटका झाली आहे. मर्चंट बॅँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजत असताना हा निकाल लागल्यामुळे त्याचे निवडणूक प्रचारात भांडवल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांपासून जिल्हा न्यायालयात या याचिकेची सुनावणी करण्यात आली.

वसुलीची कारवाई टळली : निवडणूक खर्चाचा वाद न्यायालयात

नाशिक : अठरा वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक मर्चंट बॅँकेच्या संचालक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या अवास्तव निवडणूक खर्चाच्या बालंटातून अखेर जिल्हा प्रशासन मुक्त झाले असून, या संदर्भात उच्च न्यायालय व त्यानंतर जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या वादात मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेला खर्च कसा योग्य होता हे न्यायालयाला पटवून देण्यास यश आल्याने प्रशासनाची कायद्याच्या कचाट्यातून सुटका झाली आहे. मर्चंट बॅँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजत असताना हा निकाल लागल्यामुळे त्याचे निवडणूक प्रचारात भांडवल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सन २००० मध्ये नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहकार खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर गजभिये यांनी जिल्हा निवडणूक शाखेमार्फत मर्चंट बॅँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करून निवडणूक कार्यक्रम राबविला. तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी कासार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तत्कालीन तहसीलदार बाबासाहेब पारधे हे सहायक अधिकारी म्हणून कार्यरत होते.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच या निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली होती. मतपत्रिकेवर या निवडणुका घेण्यात आल्याने सलग दोन दिवस महसूल कर्मचाºयांनी मतमोजणी करून निवडणुकीचा निकाल जाहीर केला होता. या सर्व निवडणुकीसाठी सुमारे ५० लाखांहून अधिक खर्च झाला होता व तो मर्चंट बॅँकेच्या तिजोरीतून जिल्हा प्रशासनाने केला होता. दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांनी सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने निवडणुकीवर केलेल्या अवाढव्य खर्चाबाबत संशय व्यक्त करण्यात येऊन तसे पत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आले होते व निवडणूक खर्चाचा आढावा घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावर जिल्हाधिकाºयांनी शासकीय लेखाधिकाºयामार्फत खर्चाचे लेखापरीक्षण केले असता, त्यात लेखापरीक्षकानेही सुमारे ३९ लाख ७५ हजार रुपये अतिरिक्त खर्च झाल्याचा अहवाल सादर केला होता.या खटल्याची सुनावणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायदंडाधिकाºयांपुढे होऊन त्यात बॅँकेच्या वतीने अ‍ॅड. गोरवाडकर यांनी तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अ‍ॅड. सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली. न्यायालयानेही कागदपत्रांची खात्री पटवून मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी केलेला खर्च योग्य ठरवित बॅँकेच्या वसुलीची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची १८ वर्षांनंतर कायद्याच्या कचाट्यातून मुक्तता झाली आहे.शपथेवर केले खर्चाचे समर्थन जिल्हा प्रशासन या खर्चावर ठाम असल्याने बॅँकेने थेट मुंबई उच्च न्यायालयात रक्कम वसुलीसाठी धाव घेतली व याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदरचे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे सोपवून निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून जिल्हा न्यायालयात या याचिकेची सुनावणी करण्यात आली. त्यावेळी प्रशासनाने निवडणुकीत झालेल्या खर्चाची बिले सादर करण्याबरोबरच शपथेवर सदरच्या खर्चाचे समर्थन केले होते.