शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम समितीच्या नियोजनासाठी १७ डिसेंबरचा अल्टिमेटम;विलंबामुळे प्रश्नचिन्ह : सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:08 IST

नाशिक : जिल्हा परिषदेतील विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि.३) निधी नियोजनास झालेल्या विलंबावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरताना निधीवाटपात सर्व सदस्यांना समान निधी मिळण्याची मागणी केली. तसेच बांधकाम समितीला नियोजन करण्यासाठी १७ डिसेंबरचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसदस्यांसाठी गटनिहाय नियोजन दोन दिवसात केले जाणार

नाशिक : जिल्हा परिषदेतील विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि.३) निधी नियोजनास झालेल्या विलंबावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरताना निधीवाटपात सर्व सदस्यांना समान निधी मिळण्याची मागणी केली. तसेच बांधकाम समितीला नियोजन करण्यासाठी १७ डिसेंबरचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. दरम्यान, बांधकाम समितीने आॅक्टोबर महिन्यातच नियोजन सादर केले होते. परंतु, शासन निर्णयातील फेरबदलांमुळे पुनर्नियोजनाची वेळ आल्याची बाजू प्रशासनाकडून मांडण्यात आली.बांधकाम विभागाच्या नियोजन दिरंगाईचा विषय उपस्थित झाल्यावर बांधकामचे नियोजनाचे अधिकार समितीला असल्याचे स्पष्ट करतानाच नियोजन झाले असून, समितीला ते सादरही करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने सभागृहाला दिली. तसेच सदस्यांसाठी गटनिहाय नियोजन दोन दिवसात केले जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावर उदय जाधव यांनी नियोजनाबाबत शासन आदेश न मिळाल्याच्या वादात नियोजन रखडल्याचा गौप्यस्फोट करीत त्यासंबंधीचे पत्रही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. त्यानंतर बांधकाम समितीचे सुधारित नियोजन १७ डिसेंबरपर्यंत करून सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी सादर करणार असल्याचे बांधकाम सभापती पवार यांनी सांगितले. या नियोजनात प्रत्येक सदस्याच्या गटात एक किलोमीटर रस्त्यांचे काम मिळावे, अशी सदस्यांनी जोरदार मागणी केली. त्यावर अर्धा तास चर्चा झाली. मात्र, शासन आदेशाप्रमाणेच कामांचे वाटप होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी स्पष्ट करीत या वादावर पडदा टाकला. गेल्यावर्षी मंजूर कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या नसल्याचा मुद्दा दीपक शिरसाठ यांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह सभापती मनीषा पवार, यतिंद्र पगार, सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.