शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१७५ फटाके गाळे असुरक्षित

By admin | Updated: October 30, 2016 01:29 IST

नियमांचे उल्लंघन : विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश

नाशिक : औरंगाबाद येथे जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाके विक्रीचे २०० गाळे आगीमध्ये बेचिराख झाल्याच्या घटनेमुळे नाशिकमध्येही महापालिका व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि महापालिकेने दिवसभर केलेल्या तपासणीत १९३ पैकी १७५ फटाके विक्रीच्या गाळ्यांमध्ये विस्फोटक नियमांचे उल्लंघन झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. महापालिकेने नियमांचा भंग करणाऱ्या विक्रेत्यांना जागेवरच नोटिसा बजावल्या असून, तातडीने नियमानुसार कार्यवाही न केल्यास गाळे सील करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा अहवालही पोलिसांना पाठविला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरा आयुक्तांनी नियमभंग करणाऱ्या फटाके विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने शहरात फटाके विक्रीसाठी ११ ठिकाणी १९३ गाळे लिलावाने दिले आहेत. गाळ्यांचा लिलाव करताना महापालिकेने विस्फोटक नियमांचे पालन करण्याचे निर्देश गाळेधारकांना दिले होते. त्यानुसार, गाळेधारकांकडून महापालिकेने अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्याचेही शुल्क वसूल केले आहे. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दि. २६ व २७ आॅक्टोबर रोजी सर्वच्या सर्व १९३ गाळ्यांची तपासणी केली असता, तब्बल १७५ गाळ्यांमध्ये नियमांचा भंग झाल्याचे निदर्शनास आले. त्यात प्रामुख्याने, गाळे एकमेकांना लागून उभारलेले असून दोन गाळ्यांमध्ये किमान ३ मीटरचे अंतर सोडलेले नाही. गाळ्यांमध्ये केलेल्या विद्युतीकरणात लोंबकळलेले दिवे आढळून आले. तसेच विद्युत निरीक्षकांकडून तपासणी दाखलाही उपलब्ध झाला नाही. आपत्तीमध्ये गाळ्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी रस्ता किंवा मोकळी जागा सोडली नसल्याचे निदर्शनास आले. याबाबतचा अहवाल अग्निशमन विभागाने पोलिसांना दि. २७ आॅक्टोबरला रवानाही केला, परंतु पोलीस यंत्रणेकडून कुठलीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. शनिवारी औरंगाबाद येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाक्यांच्या गाळ्यांना आग लागल्याचे वृत्त येऊन धडकताच महापालिका व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने अग्निशमन विभाग प्रमुख अनिल महाजन आणि अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांना सर्व फटाके विक्री गाळ्यांची तपासणी करण्याचे आदेशित केले. त्यानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी तपासणीसत्र राबविले असता तब्बल १७५ गाळेधारकांनी विस्फोटक कायद्याचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले. केवळ १८ गाळेधारकांनीच नियमांची पूर्तता केल्याने त्यांना अग्निशमन विभागामार्फत ना हरकत दाखला देण्यात आला, तर ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले त्यांना जागेवरच नोटिसा बजावण्यात आल्या. काही मुजोर गाळेधारकांनी तर महापालिकेच्या नोटिसाही स्वीकारण्यास नकार दिला. महापालिकेने संबंधित गाळेधारकांना काही तासांची मुदत देत नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेशित केले. त्यानंतरच अग्निशमनचा ना हरकत दाखला देण्याची भूमिका घेतली.